IPL Final, CSK vs KKR Live Updates : महेंद्रसिंग धोनीचा Suresh Raina वर विश्वास राहीला नाही?; CSK सोबतचा प्रवास संपला

Suresh Raina चेन्नईनं आजच्या सामन्यातही सुरेश रैनाला बाकावर बसवले, तर कोलकातानंही आंद्रे रसेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 07:45 PM2021-10-15T19:45:14+5:302021-10-15T19:46:38+5:30

IPL 2021 Final, CSK vs KKR Live Updates : This is the first time CSK is playing an IPL final without Suresh Raina | IPL Final, CSK vs KKR Live Updates : महेंद्रसिंग धोनीचा Suresh Raina वर विश्वास राहीला नाही?; CSK सोबतचा प्रवास संपला

IPL Final, CSK vs KKR Live Updates : महेंद्रसिंग धोनीचा Suresh Raina वर विश्वास राहीला नाही?; CSK सोबतचा प्रवास संपला

Next

IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : चेन्नई सुपर किंग्स ( CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) या संघांमध्ये आयपीएल २०२१ची फायनल होत आहे. कोलकाता नाइट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईनं आजच्या सामन्यातही सुरेश रैनाला बाकावर बसवले, तर कोलकातानंही आंद्रे रसेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेले नाही. आयपीएल स्पर्धेच्या फायनलमध्ये सर्वाधिक २४९ धावा करणाऱ्या रैनाला आजच्या सामन्यात संधी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु धोनीनं त्याच्याऐवजी रॉबीन उथप्पाला संधी देणंच योग्य समजलं. 

IPL 2021 FINAL, DUBAI - महेंद्रसिंग धोनीची ही १४व्या पर्वातील १०वी आयपीएल फायनल आहे. त्यानं पाच आयपीएल फायनल मुंबई इंडियन्सविरुद्ध, १ रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध, १ सनरायझर्स हैदराबाद आणि १ राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळली आहे. आज तो कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध फायनल खेळणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्यांदा आयपीएल फायनल खेळत आहे आणि यापूर्वी दोन्ही वेळेस त्यांनी जेतेपद पटकावले आहे. दोन्ही वेळेस त्यांनी १९०+ धावांचा पाठलाग करून बाजी मारली. आज CSK चौथं, तर KKR तिसरं जेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात आहे. कोलकातानं एकदाही फायनल गमावलेली नाही, त्यामुळे CSKसाठी ही फायनल तितकी सोपी नक्की नसेल.

रॉबीन उथप्पानं क्वालिफायर १ सामन्यात ६३ धावांची निर्णायक खेळी करून चेन्नईला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला होता. रैनाच्या जागी स्थान मिळालेल्या उथप्पानं पहिल्या दोन सामन्यांत १९ व २ अशी खेळी केली होती. पण, क्वालिफायर १मध्ये धोनीनं त्याच्यावरील विश्वास कायम ठेवला आणि त्यानंही निराश केलं नाही. त्यामुळेच फायनलमध्ये धोनीनं प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल न करणेच योग्य समजले. त्यात सुरेश रैनानंआयपीएल २०२१त १२ सामन्यांत १७.७७च्या सरासरीनं १६० धावा केल्या आहेत आणि त्याला दुखापतही झाली आहे. CSK फायनल खेळतंय आणि त्यात रैना नाही असे प्रथमच घडत आहे. 

आता पुढील आयपीएलमध्ये दोन नवीन संघ दाखल होणार आहेत आणि CSK सुरेश रैनाला रिटेन करण्याची शक्यता फार कमी आहे. सुरेश रैनानं २०५ सामन्यांत ५५२८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. 

Web Title: IPL 2021 Final, CSK vs KKR Live Updates : This is the first time CSK is playing an IPL final without Suresh Raina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app