Join us  

IPL 2021: आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकचा पराक्रम, धोनीला टाकलं मागे!, बनला सर्वोत्तम यष्टीरक्षक

IPL 2021: कोलकाताचा अनुभवी विकेटकीपर दिनेश कार्तिक याने मोठ्या विक्रमाला गवसणी घालताना थेट दिग्गज महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 2:31 PM

Open in App

अबुधाबी : कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात सलग दुसरा विजय मिळवत दिमाखात सुरुवात करताना बलाढ्य मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात कोलकाताचा अनुभवी विकेटकीपर दिनेश कार्तिक याने मोठ्या विक्रमाला गवसणी घालताना थेट दिग्गज महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलं. पण आज होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज सामन्यातून धोनीला पुन्हा एकदा हा विक्रम मिळवण्याची संधी असेल. त्यामुळेच आता आयपीएल संपेपर्यंत या दोन्ही विकेटकीपर्समधील वेगळीच स्पर्धा अनुभवण्यास मिळेल.

मोठी बातमी! बीसीसीआयचं आयपीएलच्या सर्व फ्रँचायजींना पत्र, केली महत्त्वाची सूचना

मुंबईविरुद्धच्या सामन्यात कार्तिक आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारा यष्टिरक्षक ठरला. याबाबतीत त्याने धोनीला मागे टाकले. कार्तिकने मुंबईचा भरवशाचा फलंदाज सूर्यकुमार यादव याचा झेल घेतला आणि त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारा यष्टिरक्षक असा मान मिळवला. कार्तिकने आयपीएलमध्ये स्टम्पमागे ११५ झेल घेतले असून धोनीच्या नावावर ११४ झेल आहेत. मात्र आज आरसीबीविरुद्ध खेळताना धोनी कार्तिकला गाठूही शकतो आणि त्याला मागेही टाकू शकतो.

दिल्ली कॅपिटल्स म्हणतंय नॉर्खियावर कारवाई करा; त्याला ठरवलं गुन्हेगार! नेमका गुन्हा काय?

आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारे विकेटकीपर

१. दिनेश कार्तिक : ११५ झेल२. महेंद्रसिंग धोनी : ११४ झेल३. पार्थिव पटेल : ६५ झेल४. नमन ओझा : ६५ झेल५. रिद्धिमान साहा : ५९ झेल

टॅग्स :आयपीएल २०२१दिनेश कार्तिककोलकाता नाईट रायडर्समहेंद्रसिंग धोनी
Open in App