Join us  

IPL 2021: धोनीनं चहरच्या गोलंदाजीवर लगावला असला जबरदस्त षटकार, गोलंदाजांचं वाढलं टेन्शन; पाहा VIDEO

IPL 2021, MS Dhoni: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असल्यानं धोनीलाही आयपीएलसाठी बराच वेळ मिळाला आहे. याचा तो पुरेपूर फायदा घेताना दिसत असून मैदानात प्रचंड घाम गाळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 12:16 PM

Open in App

IPL 2021, MS Dhoni: आयपीएलच्या यंदाच्या सीजनच्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. दुसरा टप्प्यातील सामने यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. सुरुवातीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होणार आहे. यासाठी यूएईमध्ये दोन्ही संघ कसून सराव करताना पाहायला मिळत आहेत. यात धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघानंही कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असल्यानं धोनीलाही आयपीएलसाठी बराच वेळ मिळाला आहे. याचा तो पुरेपूर फायदा घेताना दिसत असून मैदानात प्रचंड घाम गाळत आहे. 

इंग्लंड क्रिकेट बोर्डाची 'गुगली', IPL स्पर्धेला मोठा धक्का, वर्ल्डकपसाठी आखली जबरदस्त रणनिती

दुबईमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघानं नुकताच एक सराव सामना खेळला. यात चेन्नई सुपरकिंग्ज संघाला दोन वेगवेगळ्या संघांमध्ये विभागण्यात आलं होतं. एका संघाचं नेतृत्त्व महेंद्रसिंग धोनी करत होता. या सामन्यात धोनीसह सुरेश रैना, दीपक चाहर, ऋतूराज गायकवाड आणि इतर सदस्यांनी सहभाग घेतला. 

मँचेस्टर कसोटी रद्द का झाली?; बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानं सांगितलं खरं कारण

कॅप्टनकूल धोनीला सामन्यात चांगला सूर गवसलेला पाहायला मिळाला. धोनीनं त्याच्या ट्रेडमार्ग स्टाइलचे जबरदस्त फटके लगावले. धोनीच्या दमदार फलंदाजीचा व्हिडिओ सीएसकेनं सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर केला आहे. चेन्नई सुपरकिंग्जनं यंदाच्या सीझनमध्ये चांगल्या कामगिरीची नोंद केली आहे. सीझन स्थगित करण्यापूर्वी सीएसके गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होता. सात सामन्यांमध्ये पाच सामन्यांमध्ये धोनी ब्रिगेडनं विजय प्राप्त केला आहे. धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईनं आतापर्यंत तीनवेळा स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. 

सीएसकेनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनी दमदार फलंदाजी करताना पाहायला मिळत असून दीपक चहरच्या गोलंदाजीवर त्यानं लगावलेला एक खणखणीत षटकार सर्वांनाच अवाक् करणारा आहे. धोनीनं लगावलेला षटकार इतका उंच होता की चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला आणि तर खेळाडू स्टेडियमबाहेरील झाडाझुडूपात चेंडूचा शोध घेताना दिसत आहेत. यात धोनीही चेंडूचा शोध घेताना दिसतोय. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल २०२१IPL 2020आयपीएल २०२१ मिनी ऑक्शन
Open in App