IPL 2021: दिल्ली कॅपिटल्स म्हणतंय नॉर्खियावर कारवाई करा; त्याला ठरवलं गुन्हेगार! नेमका गुन्हा काय?

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्स संघानं आपल्याच संघातील खेळाडूवर गुन्हा दाखल करण्याची मागणी का केलीय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 01:44 PM2021-09-24T13:44:16+5:302021-09-24T13:47:58+5:30

IPL 2021 Delhi Capitals excited post about Anrich Nortje | IPL 2021: दिल्ली कॅपिटल्स म्हणतंय नॉर्खियावर कारवाई करा; त्याला ठरवलं गुन्हेगार! नेमका गुन्हा काय?

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्स म्हणतंय नॉर्खियावर कारवाई करा; त्याला ठरवलं गुन्हेगार! नेमका गुन्हा काय?

Next

दुबई : गुणतालिकेत अव्वल असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात दिमाखात सुरुवात केली. सनरायझर्स हैदराबादचा सहज पराभव करत त्यांनी चेन्नई सुपरकिंग्जकडून अव्वल स्थान हिसकावून घेतले. या सामन्यात लक्षवेधी ठरला तो वेगवान गोलंदाज अ‍ॅन्रीच नॉर्खिया. त्याने सातत्याने तुफानी वेगाने गोलंदाजी करत हैदराबादच्या फलंदाजांना जेरीस आणले आणि २ बळी घेत त्यांना रोखलेही. त्यामुळेच त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. मात्र, यानंतर याच नॉर्खियाला त्याच्याच दिल्ली संघाने गुन्हेगार ठरवले आहे. इतकेच नाही, तर त्याला दंडही लावा, असेही म्हटले आहे.

मोठी बातमी! बीसीसीआयचं आयपीएलच्या सर्व फ्रँचायजींना पत्र, केली महत्त्वाची सूचना

आयपीएलच्या यंदाच्या सत्रात सर्वात वेगाने चेंडू टाकण्याचा मान नॉर्खियाने मिळवला आहे. पण दखल घेण्याची बाब म्हणजे केवळ एक नाही किंवा दोन नाही, तर तब्बल ८ वेळा त्याने सर्वात वेगवान चेंडू आहेत. यंदाच्या आयपीएलमधील पहिले आठ वेगवान चेंडू हे नॉर्खियाचेच आहेत. त्यातही विशेष म्हणजे हैदराबादविरुद्ध त्याने चक्क ४ वेळा १५० प्रतितासहून अधिकच्या वेगाने चेंडू फेकला आहे.

हार्दिक पंड्या का खेळत नाहीय? समोर आलं मोठं कारण; शेन बाँडनं केला खुलासा

आयपीएल मुळात आहेच वेगाचा खेळ, पण नॉर्खियाच्या वेगातील सातत्य पाहून कोणताही फलंदाज अडखळणारच. त्यामुळेच दिल्लीने प्रतिस्पर्धी संघांना इशारा देताना एक धमाल कॅरिकेचर ट्वीटरवर पोस्ट केले असून यामध्ये नॉर्खियाच्या हातात गुन्हेगाराप्रमाणे एक पाटी दिल्याचे दाखवले आहे. यावर लिहिले आहे की, ‘अ‍ॅन्रीच नॉर्खिया. बॉलर. वेगाचे उल्लंघन १५१.७१ प्रतितास’

KBC च्या सेटवर रोहित शर्माचा व्हिडिओ कॉल अन् स्पर्धक म्हणाला...'मला माझ्या देवाचं दर्शन झालं'; पाहा Video

नॉर्खिया यंदा आयपीएलमध्ये आतापर्यंतचा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला असून त्याने हैदराबादविरुद्ध १५१.७१ प्रतितास इतक्या वेगाने गोलंदाजी आहे. दिल्लीचे हे धमाल ट्वीट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

Web Title: IPL 2021 Delhi Capitals excited post about Anrich Nortje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app