Join us  

IPL 2021, DC vs RR Match Highlights: संजू सॅमसन यानंही चूक मान्य केली, म्हणून दिल्लीनं बाजी मारली 

IPL 2021, DC vs RR Match Highlights: दिल्ली कॅपिटल्सनं उभ्या केलेल्या १५४ धावा सहज पार करता येतील असे राजस्थान रॉयल्सलाच काय, तर सर्वांना वाटले होते. पण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 7:42 PM

Open in App

IPL 2021, Delhi Capitals Vs Rajasthan Royals Match Highlights : दिल्ली कॅपिटल्सनं उभ्या केलेल्या १५४ धावा सहज पार करता येतील असे राजस्थान रॉयल्सलाच काय, तर सर्वांना वाटले होते. पण, सर्व गणित बदलले अन् दिल्लीनं बाजी मारून गुणतक्त्यात अव्वल स्थान गाठले. या सामन्यानंतर RRचा कर्णधार संजू सॅमसन यानंही त्यांचं नेमकं कुठं चुकलं हे मान्य केलं आणि तेच दिल्लीच्या पथ्यावर पडलं. 

राजस्थान रॉयल्सला नमवून दिल्ली कॅपिटल्सनं दिला महेंद्रसिंग धोनीला धक्का

IPL 2021, DC vs RR Match Highlights:

  • राजस्थान रॉयल्सच्या युवा गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या धावसंख्येला लगाम लावली. शिखर धवन व पृथ्वी शॉ अपयशी ठरल्यानंतर रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांनी संघर्ष केला, परंतु RRच्या कर्णधारानं गोलंदाजांचा सुरेख वापर करताना DCला मोठा पल्ला गाठू दिला नाही. 
  • मुस्ताफिजूर रहमान ( २-२२) व चेतन सकारिया ( २-३३) यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या असल्या तरी कार्तिक त्यागी ( १-४०), तबरेज शम्सी व राहुल तेवाटिया ( १-१७)  यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली. दिल्लीला २० षटकांत ६ बाद १५४ धावांपर्यंत मजल मारता आली. रिषभ-श्रेयस यांनी ६२ धावांची भागीदारी केली. रिषभ २४ धावांवर माघारी परतला, तर  अय्यरनं ३२ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह ४३ धावा केल्या. शिमरोन हेटमायरनं १६ चेंडूंत २८ धावा करताना दिल्लीच्या आशा पल्लवीत केल्या.  

  • दिल्ली कॅपिटल्सच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली. लाएम लिव्हिंगस्टोन ( १), यशस्वी जैस्वाल ( ५)  व डेव्हिड मिलर ( ७) हे धावफलकावर १७ धावा असताना माघारी परतले.  इथेच राजस्थानवरील दडपण वाढत गेले. 
  • मिलर, लिव्हिंगस्टोन यांच्याकडून RRला खूप अपेक्षा होती आणि त्यांनीच निराश केलं. त्यांनी ज्या पद्धतीनं विकेट फेकल्या त्या स्वीकारण्यासारख्या नव्हत्या. त्याचे दडपण थेट मधल्या फळीवर पडले आणि त्यानंतर RRला सावरता आले नाही. महिपाल लोम्रोर काही काळ कर्णधार संजू सॅमसनसोबत खेळपट्टीवर चिकटला होता, परंतु कागिसो रबाडानं त्याची ( १९) विकेट घेतली. 

  • रियान पराग व राहुल टेवाटिया यांनी कर्णधाराला साथ दिली नाही. संजू सॅमसन एकटाच खिंड लढवत राहिला. सॅमसन ५३ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ७० धावांवर नाबाद राहिला. सामन्यानंतर सॅमसननंही चूक मान्य केले. तो म्हणाला, आमच्याकडे क्वालिटी फलंदाज होते आणि आम्ही सहज जिंकू असे मला वाटले होते. परंतु, आम्ही विकेट्स गमावत राहिलो आणि त्यानंतर सामना आपल्या बाजूनं झुकवण्यात अपयशी ठरलो.''
टॅग्स :आयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्सराजस्थान रॉयल्स
Open in App