Join us  

IPL 2021, DC vs RR Live Updates : ICCचा टॉप गोलंदाज राजस्थाननं मैदानावर उतरवला, दिल्लीची कोंडी करण्याचा निर्धार केला 

IPL 2021, Delhi Capitals Vs Rajasthan Royals Live Updates : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यातील निकालानंतर प्ले ऑफसाठीची चुरस अधिक रंजक होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 3:13 PM

Open in App

IPL 2021, Delhi Capitals Vs Rajasthan Royals Live Updates : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यातील निकालानंतर प्ले ऑफसाठीची चुरस अधिक रंजक होईल. DCने बाजी मारली तर आयपीएल २०२१मध्ये प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचा पहिला मान ते पटकावतील, पण RRने विजय मिळवल्यास ते टॉप फोअरमध्ये प्रवेश करतील. RRच्या टॉप फोअर एन्ट्रीमुळे मुंबई इंडियन्स ( MI) व कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) यांच्यासमोरील अडचण वाढणार आहे. आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमध्ये २३ सामने झाले आहेत. त्यापैकी ११ सामने दिल्लीनं, तर १२ सामने राजस्थाननं जिंकले आहेत. 

Video : रवींद्र जडेजाने थोपटली अम्पायर अनिल चौधरी यांची पाठ; त्या एका निर्णयानं RCBला आला राग

राजस्थानला प्ले ऑफ गाठण्याच्या दृष्टीने विजय अनिवार्य असला, तरी सध्या दिल्लीकरांचा सुरू असलेला धडाका पाहता, त्यांचा विजयी रथ रोखणे राजस्थानला सोपे जाणार नाही. राजस्थानने आपल्या अखेरच्या सामन्यात पंजाब किंग्जचा अखेरच्या चेंडूवर थरारक पराभव केला होता.पहिल्या सत्रात ८ पैकी ६ सामने जिंकलेल्या दिल्लीने दुसऱ्या सत्रात दमदार सुरुवात करताना सनरायझर्स हैदराबादचा ८ गड्यांनी धुव्वा उडवला होता. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

राजस्थाननं आजच्या सामन्यात दोन बदल केले असून एव्हिन लुईस व ख्रिस मॉरिस यांच्याजागी तब्रेज शम्सी व डेव्हिड मिलर यांची निवड केली आहे. दिल्लीच्या संघातही एक बदल असून मार्कस स्टॉयनिसच्या जागी ललित यादव खेळणार आहे. शम्सी हा जागतिक क्रमवारीतील अव्वल गोलंदाज आहे आणि तो आजच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे.  

 दिल्ली कॅपिटल्सचा संघ - पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, ललित यादव, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, अॅनरिच नॉर्ट्जे, आवेश खान ( #DelhiCapitals (Playing XI): Prithvi Shaw, Shikhar Dhawan, Shreyas Iyer, Rishabh Pant (w/c), Lalit Yadav, Shimron Hetmyer, Akshar Patel, Ravichandran Ashwin, Kagiso Rabada, Anrich Nortje, Avesh Khan.)

राजस्थान रॉयल्सचा संघ - यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, लायम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मिलर, महिपाल लोमरोर, रियान पराग, राहुल टेवाटिया, कार्तिक त्यागी, चेतन सकारीया, मुस्ताफिजूर रहमान, तब्रेज शम्सी. ( #RR (Playing XI): Yashasvi Jaiswal, Sanju Samson (w/c), Liam Livingstone, David Miller, Mahipal Lomror, Riyan Parag, Rahul Tewatia, Kartik Tyagi, Chetan Sakariya, Mustafizur Rahman, Tabraiz Shamsi.) 

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App