IPL 2021, DC vs RR Live Updates : राजस्थानच्या युवा गोलंदाजांनी केली कमाल, दिल्लीच्या स्टार फलंदाजांना आणले जमिनीवर!

IPL 2021, Delhi Capitals Vs Rajasthan Royals Live Updates : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यातील निकालानंतर प्ले ऑफसाठीची चुरस अधिक रंजक होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 05:21 PM2021-09-25T17:21:49+5:302021-09-25T17:22:54+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, DC vs RR Live Updates : Delhi Capitals set 155 run target for Rajasthan Royals | IPL 2021, DC vs RR Live Updates : राजस्थानच्या युवा गोलंदाजांनी केली कमाल, दिल्लीच्या स्टार फलंदाजांना आणले जमिनीवर!

IPL 2021, DC vs RR Live Updates : राजस्थानच्या युवा गोलंदाजांनी केली कमाल, दिल्लीच्या स्टार फलंदाजांना आणले जमिनीवर!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Delhi Capitals Vs Rajasthan Royals Live Updates : रिषभ पंत व श्रेयस अय्यर या आजी-माजी कर्णधारांच्या संयमी व महत्त्वपूर्ण भागीदारीनंतर दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) सामन्यात कमबॅक केले होते. राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) गोलंदाजांनी जबाबदारी चोख पार पाडताना DCच्या धावगतीवर चाप लावला, परंतु शिमरोन हेटमारयनं अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली अन् दिल्लीनं समाधानकारक धावसंख्या उभारली. 

DCने बाजी मारली तर आयपीएल २०२१मध्ये प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचा पहिला मान ते पटकावतील, पण RRने विजय मिळवल्यास ते टॉप फोअरमध्ये प्रवेश करतील. RRच्या टॉप फोअर एन्ट्रीमुळे मुंबई इंडियन्स ( MI) व कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) यांच्यासमोरील अडचण वाढणार आहे. आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमध्ये २३ सामने झाले आहेत. त्यापैकी ११ सामने दिल्लीनं, तर १२ सामने राजस्थाननं जिंकले आहेत. 


युवा खेळाडूंची फौज घेऊन मैदानावर उतरलेल्या राजस्थान रॉयल्स संघानं ( Rajasthan Royals) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) सलामीवीरांना पॉवर प्लेमध्ये माघारी पाठवून मोठा धक्का दिला. आयपीएल २०२१ ( IPL 2021) मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या शिखर धवनची ( Shikhar Dhawan) विकेट चर्चेचा विषय ठरत आहे. युवा गोलंदाजा कार्तिक त्यागी ( Kartik Tyagi) याच्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर गब्बर दुर्दैवीरित्या बाद झाला. त्यानंतर चेतन सकारियानं DCचा दुसरा सलामीवीर पृथ्वी शॉची विकेट घेतली. दिल्लीला २१ धावांवर हे दोन धक्के बसले. 


कर्णधार रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांनी संयमी खेळ करताना संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. RRचा कर्णधार संजू सॅमसन यानं फिरकी गोलंदाजांचा योग्य वापर करून DCच्या धावगतीला चाप लावला होता. रिषभ-श्रेयस यांनी ३९ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. १२व्या षटकात मुस्ताफिजूर रहमान यानं ही भागीदारी तोडली. रहमानच्या बाऊन्सरवर फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटची कड घेत यष्टींवर आदळला अन् रिषभ २४ धावांवर माघारी परतला. ( The 45-ball 62-run stand has been broken by Mustafizur. Pant chops one back onto the stumps, OUT for a run-a-ball 24) 

अय्यर आक्रमक पवित्र्यात आला, परंतु राहुल टेवाटियाच्या चेंडूवर पुढे जाऊन फटका मारण्याच्या त्याचा प्रयत्न चुकला. संजू सॅमसननं चपळतेनं त्याला यष्टीचीत केलं. अय्यरनं ३२ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह ४३ धावा केल्या. दोन्ही सेट फलंदाज माघारी परतल्यानं दिल्ली अडचणीत आले. १५व्या षटकात त्यांनी शतकी पल्ला ओलांडला. शिमरोन हेटमायरनं १६ चेंडूंत २८ धावा करताना दिल्लीच्या आशा पल्लवीत केल्या, परंतु रहमाननं चतुराईनं त्याची विकेट घेतली.  दिल्लीनं ६ बाद १५४ धावा केल्या. 


 

Web Title: IPL 2021, DC vs RR Live Updates : Delhi Capitals set 155 run target for Rajasthan Royals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.