Join us  

IPL 2021, DC vs RR : दिल्ली-राजस्थान सामन्यात घडली कॉमेडी; सर्व पब्लिक हसू लागली, Video 

दिल्ली कॅपिटल्सच्या अखेरच्या षटकात हा प्रसंग घडला. मुस्ताफिजूर रहमाननं टाकलेल्या पाचव्या चेंडूवर आर अश्विन फटका मारण्यास हुकला. अन् कॉमेडी घडली...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 8:01 PM

Open in App

IPL 2021, Delhi Capitals Vs Rajasthan Royals Match Highlights : दिल्ली कॅपिटल्सनं उभ्या केलेल्या १५४ धावा सहज पार करता येतील असे राजस्थान रॉयल्सलाच काय, तर सर्वांना वाटले होते. पण, सर्व गणित बदलले अन् दिल्लीनं बाजी मारून गुणतक्त्यात अव्वल स्थान गाठले. या सामन्यानंतर RRचा कर्णधार संजू सॅमसन यानंही त्यांचं नेमकं कुठं चुकलं हे मान्य केलं आणि तेच दिल्लीच्या पथ्यावर पडलं. या सामन्यात जोश जल्लोष पाहायला मिळाला, तर RRच्या ताफ्यात निराशेचं वातावरणही झालं. पण, याच सामन्यात एक कॉमेडी प्रसंग घडला अन् सारे लोटपोट होऊन हसू लागले... 

IPL 2021, DC vs RR Match Highlights: संजू सॅमसन यानंही चूक मान्य केली, म्हणून दिल्लीनं बाजी मारली 

राजस्थान रॉयल्सच्या युवा गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या सलामीवीरांना २१ धावांवर माघारी पाठवले. शिखर धवन व पृथ्वी शॉ अपयशी ठरल्यानंतर रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांनी संघर्ष केला, परंतु RRच्या कर्णधारानं गोलंदाजांचा सुरेख वापर करताना DCला मोठा पल्ला गाठू दिला नाही. मुस्ताफिजूर रहमान ( २-२२) व चेतन सकारिया ( २-३३) यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या असल्या तरी कार्तिक त्यागी ( १-४०), तबरेज शम्सी व राहुल तेवाटिया ( १-१७)  यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली. दिल्लीला २० षटकांत ६ बाद १५४ धावांपर्यंत मजल मारता आली. रिषभ २४ धावांवर माघारी परतला, तर अय्यरनं ३२ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह ४३ धावा केल्या. शिमरोन हेटमायरनं १६ चेंडूंत २८ धावा केल्या.  

दिल्ली कॅपिटल्सच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली. लाएम लिव्हिंगस्टोन ( १), यशस्वी जैस्वाल ( ५)  व डेव्हिड मिलर ( ७) हे धावफलकावर १७ धावा असताना माघारी परतले.  इथेच राजस्थानवरील दडपण वाढत गेले. त्याचे दडपण थेट मधल्या फळीवर पडले आणि त्यानंतर RRला सावरता आले नाही. महिपाल लोम्रोर काही काळ कर्णधार संजू सॅमसनसोबत खेळपट्टीवर चिकटला होता, परंतु कागिसो रबाडानं त्याची ( १९) विकेट घेतली. रियान पराग व राहुल टेवाटिया यांनी कर्णधाराला साथ दिली नाही. संजू सॅमसन एकटाच खिंड लढवत राहिला. सॅमसन ५३ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ७० धावांवर नाबाद राहिला. राजस्थानला ६ बाद १२१ धावांपर्यंतच मजल मारता आली.

कॉमेडी कुठे झाली...दिल्ली कॅपिटल्सच्या अखेरच्या षटकात हा प्रसंग घडला. मुस्ताफिजूर रहमाननं टाकलेल्या पाचव्या चेंडूवर आर अश्विन फटका मारण्यास हुकला. संजू सॅमसनच्या हातात चेंडू असतानाही आर अश्विन एक धाव घेण्यासाठी धावला अन् सॅमसननं तो चेंडू गोलंदाज रहमानकडे फेकला. रन आऊट सोडा रहमाननं तो चेंडू थ्रो करून अश्विनला आणखी एक धाव घेण्याची संधी दिली.

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App