Join us  

IPL 2021: ‘गब्बर’ने साकारला दिल्लीचा विजय

शतक ८ धावांनी हुकले; पंजाब ६ गड्यांनी पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 4:17 AM

Open in App

मुंबई : पंजाब किंग्सच्या भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना ‘गब्बर’ शिखर धवनच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने ६ गड्यांनी बाजी मारली. पंजाबने ४ बाद १९५ धावा उभारल्यानंतर दिल्लीने १८.२ षटकांत ४ बाद १९८ धावा केल्या. धवनचे शतक ८ धावांनी हुकले.

पंजाबच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना धवनच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर दिल्लीचे सहज विजय मिळवला. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी त्याच्याकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. मुंबईच्या सपाट खेळपट्टीवर गोलंदाजांची परीक्षा झाली. ज्याप्रकारे मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल खेळले ते पाहता पंजाबने कमीच धावा केल्या. 

शिवाय प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अत्यंत महागडा ठरला. त्याला ४ षटकांत ५३ धावांचा चोप पडला. दिल्लीने आपल्या फलंदाजीतील ताकद दाखवून दिली. धवनला दमदार साथ दिलेल्या पृथ्वीने संघाला वेगवान सुरुवात करून           दिली.त्याआधी, मयांक अग्रवाल व कर्णधार लोकेश राहुल यांनी ११२ धावांची सलामी देत पंजाबने आव्हानात्मक मजल मारली. मात्र, इतर फलंदाज अपयशी ठरले. बर्थ डे बॉय राहुलने तीन सामन्यांतून दुसरे अर्धशतक झळकावले, तर पहिल्या दोन सामन्यांत अपयशी                 ठरलेल्या मयांकने सुरुवातीपासून दिल्लीवर हल्ला चढवला. त्याच्यामुळे पंजाबने ९ हून अधिक धावांच्या सरासरीने वाटचाल केली                      होती. राहुलचे तब्बल तीन झेल सोडत दिल्लीकरांनी त्याला वाढदिवसाची भेटच दिली. शाहरुख खानच्या छोटेखानी फटकेबाजीमुळे            पंजाबने आव्हानात्मक 

n स्टीव्ह स्मिथने दिल्ली         कॅपिटल्सकडून आयपीएल पदार्पण केले.n २०१८ पासून पंजाबने १२ वेळा शतकी सलामी दिली             असून, यापैकी ११  भागीदाऱ्यांमध्ये लोकेश राहुलचा सहभाग.n टी-२० क्रिकेटमध्ये कागिसो रबाडाने २०० बळी पूर्ण केले.धावसंख्या उभारली.

टॅग्स :आयपीएल २०२१शिखर धवन