Join us  

IPL 2021, DC vs PBKS T20 Live : दिल्ली कॅपिटल्सकडून विजयाचं 'शिखर' सर; पंजाब किंग्सचा लाजीरवाणा पराभव

ipl 2021  t20 DC vs PBKS live match score updates Mumbai शिखर धवननं ४९ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह ९२ धावांवर बाद झाला. पण, त्यानं दिल्लीच्या विजयाचा पाया रचला होता. दिल्लीनं हा सामना ६ विकेट्स राखून जिंकून गुणतालिकेत आगेकूच केली.  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 11:16 PM

Open in App

ipl 2021  t20 DC vs PBKS live match score updates Mumbai : पंजाब किंग्सच्या ४ बाद १९५ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. पृथ्वी शॉ आज आक्रमक मूडमध्ये होता, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. मात्र, शिखर धवननं ही उणीव भरून काढली. त्यानं पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शिखर धवननं ४९ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह ९२ धावांवर बाद झाला. पण, त्यानं दिल्लीच्या विजयाचा पाया रचला होता. दिल्लीनं हा सामना ६ विकेट्स राखून जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आगेकूच केली. मुंबई इंडियन्सची तिसऱ्या स्थानी घसरण झाली.  सनरायझर्स हैदराबादसाठी आणखी एक वाईट बातमी; मुथय्या मुरलीधरन हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट

पृथ्वी शॉ - शिखऱ धवनची फटकेबाजीदिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनीही चांगली सुरूवात केली. पृथ्वी आज चांगल्या फॉर्मात दिसत होता आणि त्यानं काही सुरेख फटकेही मारले. पण, अर्षदीप सिंहनं DCला पहिला धक्का बसला. पृथ्वी १७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३२ धावांवर बाद झाला आणि शिखरसोबतची त्याची ५९ धावांची भागीदारी संपुष्टात आली. DCकडून पहिलाच आयपीएल सामना खेळणाऱ्या स्टीव्ह स्मिथला ( ९) फार कमाल दाखवता आली नाही. या दोघांनी ३३ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी केली, परंतु त्यात धवनच्याच धावा जास्त होत्या. DC vs PBKS Live Score, IPL 2021 DC vs PBKS, DC vs PBKS Live Match

रिषभ पंत- मार्कस स्टॉयनिसनं DCचा गिअर बदलला...कर्णधार रिषभ पंत येताच दिल्लीनं धावांचा वेग वाढवला. चौकार-षटकारांची बरसात होऊ लागली आणि त्यात शिखर धवननं आयपीएल २०२१तील त्याच्या पहिल्या शतकाची नोंद करता आली असती. संजू सॅमसन ( ११९) याच्यानंतर आयपीएल २०२१त शतक करणारा तो दुसरा फलंदाज ठरणार होता. पण, त्याचे शतक पुन्हा हुकले. पण, धवननं तीन सामन्यांत १८६ धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडी घेतली. ग्लेन मॅक्सवेल ( १७६) व लोकेश राहुल ( १५७) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मार्कस स्टॉयनिसनं रिषभला साजेशी साथ दिली. मोहम्मद शमीनं टाकलेल्या १७व्या षटकात स्टॉयनिसनं फ्री हिटचा फायदा उचलताना २० धावा चोपल्या. DC vs PBKS IPL match 2021, DC vs PBKS T20 Match

१८ चेंडूंत १६ धावांची गरज असताना रिषभ पंत ( १५) झेलबाद झाला. दीपक हुडानं सीमारेषेनजीक त्याचा झेल टिपला. ही कॅच पकडताना त्याचा जवळपास पाच प्रयत्न करावे लागले. १८व्या षटकात ललित यादवचा कॅच शमीला जज करता आला नाही आणि त्याचा झेल सूटला. दिल्लीन ६ विकेट्स व १० चेंडू राखून सामना जिंकला. दिल्लीनं ४ बाद १९८ धावा केल्या. स्टॉयनीस १३ चेंडूंत २७ धावांवर नाबाद राहिला. IPL 2021 latest news, DC vs PBKS IPL Matches

मयांक-लोकेश यांची विक्रमी भागीदारी...मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) आणि लोकेश राहुल या दोघांनी १२२ धावांची विक्रमी भागीदारी केली. मयांक ३६ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारासह ६९ धावांवर माघारी परतला.  ही आयपीएलमधील पंजाब किंग्सकडून सलामीवीरांची पाचवी सर्वोत्तम कामगिरी ठरली.  लोकेश ५१ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला. दीपक हुडानं पहिलाच चेंडू सीमापार टोलावून त्याचा इरादा स्पष्ट केला. ख्रिस गेल ( ११) धावांवर माघारी परतला. निकोलस पुरन ( ९) आजही काही खास करू शकला नाही.  पंजाब किंग्सला ४ बाद १९५ धावांवर समाधान मानावे लागले. दीपक हुडा २२ (१३ चेंडू) व शाहरुख खान १५ ( ५ चेंडू) धावांवर नाबाद राहिले.  ग्लेन मॅक्सवेलनं KKRला धु धु धुतले अन् प्रीती झिंटाचे मीम्स व्हायरल झाले!

टॅग्स :आयपीएल २०२१शिखर धवनदिल्ली कॅपिटल्सपंजाब किंग्स