Join us  

IPL 2021, DC vs KKR, Live: रिषभ पंतनं नाणेफेक जिंकली, कोलकाता करणार फलंदाजी; अमित मिश्राला दुखापत, जाणून घ्या Playing XI

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 6:44 PM

Open in App

IPL 2021, DC vs KKR, Live: आयपीएलमध्ये आज 'डबल हेडर' धमाक्यात दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येतोय. दिल्ली कॅपिटल्सनं सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. कोलकातानं संघात कोणताही बदल केलेला नाही. पण दिल्ली कॅपिटल्सच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. 

दिल्ली कॅपिटल्सचा महत्वचा फिरकीपटू अमित मिश्रा याच्या खांद्याला दुखापत झाल्याची माहिती रिषभ पंतनं दिली आहे. त्यामुळे तो आजचा सामना खेळू शकत नाहीय. त्याच्या जागी ललित यादव याला संधी देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये विजयी लय कायम राखायची झाल्यास  कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांना आज दिल्ली कॅपिटल्सच्या दमदार माऱ्यापुढे भक्कमपणे धावा काढण्याचे अवघड आव्हान असणार आहे. केकेआर संघ फलंदाजांच्या कचखाऊ वृत्तीपुढे हतबल झालेला दिसतो आहे.

दिल्लीकडे शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ आणि कर्णधार ऋषभ पंत धावा काढण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांची बरोबरी साधण्यासाठी केकेआरच्या आघाडीच्या फळीलादेखील धावा काढाव्याच लागतील. त्यासाठी फलंदाजी क्रम बदलावा लागू शकतो. दिग्गज सुनील गावसकर यांनीही अशीच सूचना केली होती. दिल्लीला मागच्या सामन्यात आरसीबीकडून एका धावेने पराभव पचवावा लागला. रविचंद्रन अश्विनने माघार घेतल्यानंतरही ईशांत शर्मा, कागिसो रबाडा, अवेश खान, अमित मिश्रा, अक्षर पटेल यांच्या माऱ्यापुढे केकेआरच्या फलंदाजांची कठोर परीक्षा आहे. 

संघ

कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders)नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, इऑन मार्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, सुनील नरेन, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, हरभजन सिंग, वरुण चक्रवर्ती, शिमव मावी

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ, रिषभ पंत (कर्णधार) शिमरन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, ललित यादव, अक्षर पटेल, कगिसो रबाडा, आवेश खान, इशांत शर्मा 

टॅग्स :आयपीएल २०२१कोलकाता नाईट रायडर्सदिल्ली कॅपिटल्सरिषभ पंत