Join us  

IPL 2021, CSK Won 4th Title : Sakshi Dhoni इमोशनल झाली, सामना संपताच महेंद्रसिंग धोनीला कडकडून मिठी मारली, Video

CSK च्या विजयानंतर MS Dhoniची पत्नी साक्षी व मुलगी जिवा यांनी मैदानावर धाव घेतली. Sakshi नं धोनीला मिठी मारून तिचा आनंद व्यक्त केला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 12:19 AM

Open in App

IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : चेन्नई सुपर किंग्स ( CSK)नं IPL 2021 Final मध्ये कोलकाता नाइट रायडर्सवर ( KKR) २७ धावांनी विजय मिळवताना चौथं जेतेपद नावावर केलं. चेन्नईनं विजयासाठी ठेवलेल्या १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ ९ बाद १६५ धावा करू शकला. बिनबाद ९१ वरून कोलकाताचे ९ फलंदाज ७४ धावांत माघारी परतले. या विजयानंतर MS Dhoniची पत्नी साक्षी व मुलगी जिवा यांनी मैदानावर धाव घेतली. Sakshi नं धोनीला मिठी मारून तिचा आनंद व्यक्त केला. ( A family hug between MS Dhoni family.)

ऋतुराज गायकवाड  व फॅफ ड्यू प्लेसिस ही जोडी यंदाच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी सलामीवीर जोडी ठरली. त्यांनी ७५२ हून अधिक धावा केल्या. ऋतुराजनं वैयक्तित ३२ धावा करताना फॅफसह पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या. रॉबीन उथप्पानं १५ चेंडूंत ३ खणखणीत षटकारांसह ३१ धावा कुटल्या. मोईन अली अली २० चेंडूंत ३७ धावांवर नाबाद राहिला. फॅफनं ५९ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ८६ धावा केल्या आणि चेन्नईला २० षटकांत ३ बाद १९२ धावा उभारून दिल्या. कोलकाताचा ल्युकी फर्ग्युसननं ५६ धावा दिल्या. सुनील नरीननं २६ धावांत २ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात शुबमन गिल व वेंकटेश अय्यर यांनीही धुरळा उडवला. वेंकटेशनं ३१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.  ११व्या षटकात KKRच्या डावाला कलाटणी मिळाली. शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा CSKचा संकटमोचक ठरला. त्यानं ११व्या षटकात वेंकटेश ( ५०)  व नितीश राणा ( ०) यांना माघारी पाठवले. त्यानंतर कोलकातानं विकेट्सची रांग लावली. सुनील नरीन ( २), गिल (५१), इयॉन मॉर्गन ( ४), दिनेश कार्तिक (९), शाकिब अल हसन (०), राहुल त्रिपाठी ( २) हे अपयशी ठरले. दीपक चहरनं ३१ धावांत १, रवींद्र जडेजानं ३७ चेंडूंत २ विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूडनंही दोन, तर शार्दूलनं ३८ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  

     

टॅग्स :आयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनीजीवा धोनीचेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App