Join us  

IPL 2021, CSK vs RR T20 Live : महेंद्रसिंग धोनी - रवींद्र जडेजा यांनी CSKचा घात केला; RRचा चेतन सकारिया चमकला

ipl 2021 t20 CSK vs RR live match score updates Mumbai : चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) फलंदाजांनी वैयक्तिक कामगिरी उंचावली, परंतु त्यांना मोठी भागीदारी करता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 9:22 PM

Open in App

ipl 2021 t20 CSK vs RR live match score updates Mumbai : चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) फलंदाजांनी वैयक्तिक कामगिरी उंचावली, परंतु त्यांना मोठी भागीदारी करता आली नाही. फॅफ ड्यू प्लेसिल, मोईन अली, अंबाती रायुडू व सुरेश रैना यांनी CSKसाठी मजबूत पाया उभारून दिला. राजस्थान रॉयल्सच्या ( Rajasthan Royals) गोलंदाजांनीही चांगले कमबॅक केले. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) व रवींद्र जडेजा यांच्याकडे ६ षटकं खेळण्यासाठी असतानाही त्यांना समाधानकारक धावा करता आल्या नाहीत. या दोघांनी २१ चेंडूंत २२ धावांची भागीदारी केली. फ्रंटसीटवर बसलेली CSK अखेरच्या सहा षटकांत RRनं बॅकसीटवर फेकले. चेतन सकारियानं तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.  IPL 2021 : CSK vs RR T20 Live Score Update

फॅफ-अली सुसाट, पण...ऋतुराज गायकवाडनं ( १०) मिळालेल्या संधीवर पुन्हा पाणी फिरवले. पण, फॅफ ड्यू प्लेसिसनं ( Faf du Plessis) सर्वांचे मनोरंजन केलं. जयदेव उनाडकटच्या पाचव्या षटकात फॅफनं दोन अतरंगी फटके मारताना १९ धावा चोपल्या. त्यानं तीन चौकार व एक षटकार खेचले. पण, सहाव्या षटकात ख्रिस मॉरिसनं त्याला बाद केले. फॅफ १७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३३ धावा कुटल्या. त्यानंतर मोईन अली सुसाट सुटला होता, पण राहुल टेवाटियाच्या फिरकीवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. अलीनं २० चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह २६ धावा केल्या. IPL 2021 CSK vs RR Live T20 Score 

चेतन सकारियानं सामना फिरवला३ बाद ७८ अशा अवस्थेत असताना CSKच्या ताफ्यातील सर्वात अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू व सुरेश रैना खेळपट्टीवर फटकेबाजी करताना दिसले. रायुडूचा परतलेला फॉर्म चेन्नईसाठी सुखावणारा ठरला. त्यानं १७ चेंडूंत ३ षटकारांसह २७ धावा चोपताना चौथ्या विकेटसाठी रैनासह २६ चेंडूंत ४५ धावा जोडल्या. चेतन सकारीयानं त्याची विकेट घेतली. त्याच षटकात संजू सॅमसन यानं रैनाला धावबाद करण्याची सोपी संधी गमावली. पण, चेतननं सुरेख गोलंदाजी करताना सुरेश रैनाला १८ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले.CSK vs RR IPL match 2021, CSK vs RR T20 Match 

चेन्नईनं १४ षटकांत ५ बाद १२५ धावा केल्या होत्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) व रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) ही जोडी खेळपट्टीवर असल्यानं RRच्या ताफ्यात धाकधुक होती. पण, RRच्या गोलंदाजांचे कौतुक करायला हवं. धोनी व जडेजा जोडीनं १७ चेंडूनंतर पहिला चौकार मिळवला.  CSK एकवेळेस १९०+ धावांचा पल्ला सहज पार करेल असे वाटत होते. धोनी १७ चेंडूंत १८ धावांत माघारी परतला. युवा गोलंदाज चेतननं ३६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. जडेजा ६ चेंडूंत ८ धावा करून ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. चेन्नईला २० षटकांत ९ बाद १८८ धावा करता आल्या.  IPL 2021 CSK vs RR, CSK vs RR Live Match

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्स