Join us  

IPL 2021, CSK vs RR T20 : चेन्नईच्या विजयानंतर चर्चा असेल तर रवींद्र जडेजाच्या भन्नाट सेलिब्रेशनची, Video

IPL 2021, Ravindra Jadeja सॅम कुरननं २४ धावांत २, रवींद्र जडेजानं २८ धावांत २, तर मोईन अलीनं ७ धावांत ३ विकेट्स घेतल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 12:35 AM

Open in App

ipl 2021 t20 CSK vs RR live match score updates Mumbai : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) सोमवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ( Rajasthan Royals) ४५ धावांनी विजय मिळवला. CSKच्या ९ बाद १८८ धावांचा पाठलाग करताना RRचा संघ ९ बाद १४३ धावा करू शकला. सॅम कुरननं २४ धावांत २, रवींद्र जडेजानं २८ धावांत २, तर मोईन अलीनं ७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. मोईन अलीला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आलं. या सामन्यात जडेजानं चार सुरेख झेल टिपले आणि त्यानंतर त्यानं भन्नाट सेलिब्रेशनही केलं. 

चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) फलंदाजांनी वैयक्तिक कामगिरी उंचावली, परंतु त्यांना मोठी भागीदारी करता आली नाही. फॅफ ड्यू प्लेसिस ( ३३) , मोईन अली ( २६) , अंबाती रायुडू ( २७) व सुरेश रैना ( १८) यांनी CSKसाठी मजबूत पाया उभारून दिला. ड्वेन ब्राव्होनं ८ चेंडूंत नाबाद २० ( २ चौकार व १ षटकार) धावा करून चेन्नईला ९ बाद १८८ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. चेतन सकारियानं ३६ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  

जोस बटलर व मनन वोहरा यांनी RRला चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी २३ चेंडूंत ३० धावा जोडल्या, परंतु सॅम कुरननं वोहराला ( १४) माघारी जाण्यास भाग पाडले. शिवम दुबेनं घरच्या मैदानावर CSKचा पाहुणचार घेतला. ४२ धावांची ही भागीदारी रवींद्र जडेजानं तोडली. जोस बटलर ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४९ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्याच षटकात जडेजानं RRचा सेट फलंदाज दुबेलाही ( १७) पायचीत करून माघारी पाठवले.  १५व्या षटकात मोईन अलीनं आणखी दोन धक्के देत CSKचा विजय पक्का केला. राजस्थान रॉयल्सला २० षटकांत ९ बाद १४३ धावाच करता आल्या.  

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :आयपीएल २०२१रवींद्र जडेजाचेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्स