Join us  

IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनीचं द्विशतक, पंजाब किंग्सविरुद्ध उतरवला तगडा संघ 

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update :  महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ( MS Dhoni)  चेन्नई सुपर किंग्सचा संघ ( Chennai Super Kings) आज पंजाब किंग्सचा ( Punjab Kings) सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 7:04 PM

Open in App

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update :  महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ( MS Dhoni)  चेन्नई सुपर किंग्सचा संघ ( Chennai Super Kings) आज पंजाब किंग्सचा ( Punjab Kings) सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. दिल्ली कॅपिटल्सनं ( DC) पहिल्या सामन्यात CSKच्या गोलंदाजांना उघडे पाडले होते. DCनं तो १८९ धावांचे लक्ष्य ७ विकेट्स राखून सहज पार केले होते. त्यामुळे PBKSच्या तगड्या फलंदाजांसमोर आज CSKच्या गोलंदाजांची खरी कसोटी लागणार आहे. आता त्या चुका सुधारून चेन्नई सुपर किंग्सला आजच्या सामन्यात पंजाब किंग्सच्या ख्रिस गेल, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, दीपक हुडा या तगड्या फलंदाजांना रोखावे लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्सनं नाणेफेक जिंकून धावांचा पाठगाल करण्याचा निर्णय घेतला आहे.  IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update

महेंद्रसिंग धोनीसाठी आजचा सामना हा चेन्नई सुपर किंग्सकडून २००वा सामना ठरला आहे. धोनीनं आतापर्यंत CSKकडून १९९ सामने खेळले आहेत आणि त्यापैकी १७५ सामने आयपीएलमध्ये, तर २४ सामने चॅम्पियन् लीग ट्वेंटी-२०त खेळले आहेत. त्यानं ४५०७ धावा केल्या आहेत. चेन्नई व पंजाब या दोन्ही संघांही अंतिम ११मध्ये कोणताच बदल केला नाही.  ipl 2021 t20 CSK vs PBKS live match score updates Mumbai

पंजाब किंग्स ( Punjab Kings Playing XI : लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, दीपक हुडा, निकोलस पुरन, शाहरुख खान, झाय रिचर्डसन, मुरुगन अश्विन, रिली मेरेडीथ, मोहम्मद शमी, अर्षदीप सिंग ( KL Rahul (w/c), Mayank Agarwal, Chris Gayle, Deepak Hooda, Nicholas Pooran, Shahrukh Khan, Jhye Richardson, Murugan Ashwin, Riley Meredith, Mohammad Shami, Arshdeep Singh.)

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings XI) : ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यु प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू, मोईन अली, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, ड्वेन ब्राव्हो, शार्दूल ठाकूर, दीपक चहर ( Ruturaj Gaikwad, Faf du Plessis, Suresh Raina, Ambati Rayudu, Moeen Ali, MS Dhoni (c & wk), Ravindra Jadeja, Sam Curran, Dwayne Bravo, Shardul Thakur, Deepak Chahar) 

कमजोर बाजू

  • चेन्नई :धोनी, रितुराज, फाफ ड्युप्लेसिस आऊट ऑफ फॉर्म.  
  • पंजाब : गोलंदाजी चिंतेचा विषय. झाय रिचर्डसन व रिले मेरिडथ महागडे ठरले. 

मजबूत बाजू

  • चेन्नई : रैना, मोईन अली, सॅम कुरेन शानदार फॉर्मात. धोनीसारखा कुशल कर्णधार. ड्युप्लेसिसमध्ये एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता.
  • पंजाब : लोकेश राहुलचे कल्पक नेतृत्व.  राहुल, ख्रिस गेल, दीपक हुडा यांचा शानदार फॉर्म. मोहम्मद शमी व अर्शदीपच्या समावेशामुळे गोलंदाजी आक्रमण मजबूत.
टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सपंजाब किंग्स