IPL 2021, CSK vs KKR : थरारक सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं बाजी मारली, नेटिझन्सना अनुष्का शर्मा आठवली

चेन्नई सुपर किंग्सनं थरराक सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सवर २ विकेट्स राखून विजय मिळवला अन् गुणतक्त्यात १६ गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 08:43 PM2021-09-26T20:43:01+5:302021-09-26T20:44:11+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, CSK vs KKR : Twitter erupts as CSK reclaim top position with a thrilling win over KKR | IPL 2021, CSK vs KKR : थरारक सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं बाजी मारली, नेटिझन्सना अनुष्का शर्मा आठवली

IPL 2021, CSK vs KKR : थरारक सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं बाजी मारली, नेटिझन्सना अनुष्का शर्मा आठवली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई सुपर किंग्सनं थरराक सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सवर २ विकेट्स राखून विजय मिळवला अन् गुणतक्त्यात १६ गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेतली. ( Chennai Super Kings (CSK) defeated Kolkata Knight Riders (KKR) by two wickets in a thrilling encounter ). KKRनं ठेवलेल्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना CSKच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली आणि त्यानंतर रवींद्र जडेजानं तुफान फटकेबाजी केली. त्यानं ८ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून २२ धावा कुटल्या. 

रोहितची पत्नी रितिका समोर बसलीय, परंतु चर्चा मागे उभ्या असलेल्या सुंदरीची, कोण आहे ती?


अखेरच्या षटकात चार धावांची गरज असताना सुनील नरीननं सॅम कुरन व जडेजा या दोन महत्त्वाच्या विकेट्स टिपल्या. त्यानंतर एका चेंडूत एक धाव असा सामना चुरशीचा झाला. दीपक चहरनं विजयी धाव घेतली. फॅफ ड्यू प्लेसिस ( ४४), ऋतुराज गायकवाड ( ४०) व मोइन अली ( ३२) यांनी दमदार कामगिरी केली. KKRकडून राहुल त्रिपाठीनं ३३ चेंडूंत ४५ धावा केल्या आणि दीनेश कार्तिकनं ११ चेंडूंत २६ व नितीश राणानं ३७ धावा केल्या. 


चेन्नईच्या या विजयानंतर वीरेंद्र सेहवागसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले, तर नेटिझन्सनी मीम्सचा पाऊस पाडला.




Web Title: IPL 2021, CSK vs KKR : Twitter erupts as CSK reclaim top position with a thrilling win over KKR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.