Join us  

IPL 2021, CSK vs KKR T20 Live: MS Dhoniचा विश्वास सार्थ ठरवला, ऋतुराज गायकवाड चमकला; २०१३नंतर CSKनं मोठा विक्रम नोंदवला 

IPL 2021  t20 Csk vs KKR live match score updates mumbai : मागील तीन सामन्यांत अपयशी ठरलेल्या ऋतुराज गायकवाडनं आज चांगली सुरुवात करून दिली. त्याच्या खेळात आत्मविश्वास जाणवत होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 8:38 PM

Open in App

IPL 2021  t20 Csk vs KKR live match score updates mumbai : मागील तीन सामन्यांत अपयशी ठरलेल्या ऋतुराज गायकवाडनं आज चांगली सुरुवात करून दिली. त्याच्या खेळात आत्मविश्वास जाणवत होता. ऋतुराज व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५४ धावा चोपून काढताना KKRच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. कोणताच आक्रसताळेपणा न दाखवता दोन्ही फलंदाजांनी क्रिकेटचे क्लासिक शॉट्स मारून मंत्रमुग्ध केले. ऋतुराजनं ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधील त्याचे हे चौथे अर्धशतक ठरले. ऋतुराजनं आत्मविश्वासानं KKRच्या गोलंदाजांचा सामना केला. त्यानं फॅफसह पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. ऋतुराज ४२ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावांवर बाद झाला. आयपीएलमध्ये CSKनं २०१३नंतर प्रथमच KKRविरुद्ध पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. यापूर्वी २०१३ ला चेन्नईत हसी व वृद्घीमान सहा यांनी १०३ धावांची भागीदारी केली होती.  IPL 2021 : CSK vs KKR T20 Live Score Update

  • कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार आहे. KKRनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.  KKRच्या संघात दोन बदल केले - हरभजन व शाकिब OUT; कमलेश नागरकोटी व सुनील नरीन IN, तर CSKच्या संघात एक बदल - लुंगी एनगिडी IN, ड्वेन ब्राव्हो OUT पाहायला मिळाला.  
  • फॅफ ड्यू प्लेसिसनं १ धाव करताच ट्वेंटी-२०त ६००० धावा करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा सहावा फलंदाज ठरला. यापूर्वी, एबी डिव्हिलियर्स ( ९२३६), डेव्हिड मिलर ( ७२३८), कॉलिन इंग्राम ( ६९४२), जेपी ड्यूमिनी ( ६३९७) आणि क्विंटन डी कॉक ( ६१३४)यांनी ही कामगिरी केली आहे. दिनेश कार्तिकचा हा २००वा आयपीएल सामना आहे. धोनी व रोहित शर्मा यांच्यानंतर २०० सामने खेळणारा तो तिसरा खेळाडू आहे. 
  • कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) - शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नरीन/ल्युकी फर्गुसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, वरुण चक्रवर्थी, प्रसिद्ध कृष्णा  
  • चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) - रॉबीन उथप्पा/ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, महेंद्रसिंग धोनी, लुंगी एनगिडी, शार्दूल ठाकूर, दीपक चहर   
टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स