Join us  

IPL 2021, CSK vs KKR, Live: कोलकाताचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, धोनीनं अष्टपैलू खेळाडूला बाहेर बसवलं!

IPL 2021, CSK vs KKR, Live: आयपीएलच्या १४ व्या पर्वातील दुसऱ्या टप्प्यात आज अबूधाबीमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात लढत होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 2:18 PM

Open in App

IPL 2021, CSK vs KKR, Live: आयपीएलच्या १४ व्या पर्वातील दुसऱ्या टप्प्यात आज अबूधाबीमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात लढत होत आहे. सामन्याची नाणेफेक जिंकून कोलकाता नाइट रायडर्स संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी कोलकाताच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर चेन्नईच्या संघात मात्र मोठा बदल करण्यात आला आहे. धोनीनं गेल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केलेल्या अष्टपैलू ड्वेन ब्रावोला विश्रांती दिली आहे. तर त्याच्या जागी वेगवान गोलंदाज सॅम कुरन याला संधी दिली आहे. 

सीएसकेचा संघ तुफान फॉर्मात असून आजचा सामना जिंकून गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठण्याची संधी धोनी ब्रिगेडकडे असणार आहे. तर कोलकाता नाइट रायडर्ससाठी फ्ले ऑफमधील आपली दावेदारी आणखी बळकट करण्यासाठी आजचा सामना जिंकणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. कोलकाताचा संघ गुणतालिकेत ८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. 

'माझी पत्नी मला CSK ची जर्सी घालू देईना', RCB फॅन पत्नीची तक्रार घेऊन पती पोहोचला थेट स्टेडियममध्ये!

आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात निराशाजनक कामगिरी करत असलेल्या कोलकाताचं दुसऱ्या टप्प्यात एक वेगळच रुप पाहायला मिळत आहे. कोलकाताकडून पदार्पण करणाऱ्या व्यंकटेश अय्यरनं पहिल्या दोन सामन्यांत खणखणीत सुरुवात करत आपली वेगळी छाप पाडली आहे. चांगल्या सलामीजोडीसाठी अडचणी सापडलेल्या कोलकाताच्या संघाला व्यंकटेश अय्यरनं एक स्थैर्य निर्माण करुन दिलं आहे. गेल्याच सामन्यात अय्यरनं अवघ्या २५ चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. त्यामुळे तुफान फॉर्मात असलेल्या व्यंकटेशला रोखण्याचं आव्हान आज चेन्नईसमोर असणार आहे. 

KKR चा स्विमिंग पूलमध्ये 'फाइट क्लब', असा खेळ कधी पाहिलाय का? Video...

दुसरीकडे चेन्नईच्या ताफ्यात सलामीवीर ऋतूराज गायकवाड पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. गायकवाड चांगली फलंदाजी करत असून आजच्या सामन्यात संघासाठी मोठी खेळी साकारुन संघाला विजय प्राप्त करुन देण्याची संधी गायकवाडकडे असणार आहे. चेन्नईकडून ड्वेन ब्रावोनं गेल्या सामन्यात स्लोवर चेंडूंचा अचूक मारा करत बंगलोरला वेसण घातलेलं पाहायला मिळालं होतं. ब्रावोच्या कामगिरीवरही लक्ष असणार आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App