Join us  

IPL 2021, CSK vs KKR : MS Dhoniनं अफलातून कॅच घेऊनही अम्पायरनं KKRच्या फलंदाजाला नाबाद ठरवले, कारण...

IPL 2021, CSK vs KKR : आयपीएलच्या १४ व्या पर्वातील दुसऱ्या टप्प्यात आज अबूधाबीमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात लढत होत आहे. सामन्याची नाणेफेक जिंकून कोलकाता नाइट रायडर्स संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 4:10 PM

Open in App

IPL 2021, CSK vs KKR :  शुबमन गिल याला पुन्हा एकदा अपयश आले. जीवदान मिळूनही त्याला दुर्दैवीरित्या धावबाद होऊन माघारी जावं लागलं. सामन्याच्या पहिल्याच षटकात दीपक चहरच्या चेंडूवर LBWच्या अपीलवर मैदानावरील अम्पायरनं गिलला बाद दिले, परंतु त्यानं DRS घेतला अन् त्यामुळे तो वाचला. पण, पुढच्याच चेंडूवर वेंकटेश अय्यरच्या लेट कॉलनं त्याचा घात केला. अंबाती रायुडूनं डायरेक्ट हिटवर त्याला धावबाद केले. त्यानंतर राहुल त्रिपाठी व अय्यर या जोडीनं KKRचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी महेंद्रसिंग धोनीनं यष्टिंमागे त्रिपाठीचा अफलातून झेल टिपला, परंतु अम्पायरनं त्याला नाबाद दिल्यानं धोनीचा पारा चढला...

नेमकं काय घडलं?डावाच्या चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर सॅम कुरननं टाकलेल्या बाऊन्सरवर त्रिपाठी लेट कर मारायला गेला आणि चेंडू व बॅटचा योग्य संपर्क न झाल्यानं तो धोनीच्या दिशेनं गेला. धोनीनंही हवेत झेपावताना अप्रतिम कॅच घेतला. मैदानावरील अम्पायरनी सुरुवातीला त्रिपाठीला बाद दिले, परंतु त्रिपाठी खेळपट्टीवर उभा राहिला अन् अम्पायरला तिसऱ्या अम्पायरकडे जावं लागलं. मैदानावरील अम्पायर हा चेंडू नो बॉल आहे का हे तपासण्यासाठी तिसऱ्या अम्पायरकडे गेले. सॅमनं रेषेच्या आतूनच चेंडू टाकला होता, परंतु हा त्या षटकातील दुसरा बाऊन्सर असल्यानं त्रिपाठीला नाबाद द्यावं लागलं. अम्पायरच्या या कृतीवर धोनी भडकला, पण नियमापुढे तोही काहीच करू शकत नव्हता. त्रिपाठीनं फ्री हिट चेंडूवर खणखणीत षटकार मारला.( Rahul Tripathi survives! A catch behind off the bowling of Sam Curran was chalked off for height as this was the second ball of the over above shoulder height) 

टॅग्स :आयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App