Join us  

IPL 2021, CSK vs KKR : पायातून रक्त वाहत होते, तरीही फॅफ ड्यू प्लेसिस खेळला; प्रत्येक चाहता त्याच्या प्रेमात पडला

IPL 2021, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) इंडियन प्रीमिअर लीग २०२१ ( IPL 2021) च्या आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ससमोर ( CSK) १७२ धावांचे तगडे आव्हान उभे केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 5:54 PM

Open in App

IPL 2021, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) इंडियन प्रीमिअर लीग २०२१ ( IPL 2021) च्या आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ससमोर ( CSK) १७२ धावांचे तगडे आव्हान उभे केले आहे. राहुल त्रिपाठीच्या फटकेबाजीला नितीश राणा, दिनेश कार्तिक व आंद्रे रसेल यांची उत्तम साथ मिळाली. पण, या सामन्यात प्रत्येक चाहता प्रेमात पडला तो फॅफ ड्यू प्लेसिसच्या ( Faf du plessis) कमिटमेंटला. डावाच्या सुरुवातीलाच कॅच घेण्याच्या प्रयत्नात त्याच्या बोटाला दुखापत झाली. काहीकाळ मैदानाबाहेर जाऊन प्राथमिक उपचार घेऊन तो पुन्हा आला. क्षेत्ररक्षणादरम्यान त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली अन् त्यातून रक्त वाहत होते. तरीही तो अखेरपर्यंत संघासोबत राहिला अन् त्याच जखमी पायानं हवेत झेपावत सीमारेषेवर अप्रतिम झेल टिपला...

 'लॉर्ड शार्दूल' चा नाद करायचा नाय; आंद्रे रसेलची विकेट घेत दाखवली धमक, Video

२०१९च्या आयपीएल फायनलमध्ये शेन वॉटसन असाच रक्तबंबाळ गुडघ्यानं मैदानावर फटकेबाजी करत होता आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत होता. आज फॅफनंही तसंच केलं. त्याच समर्पण पाहून चाहतेही त्याच्या प्रेमात पडले. KKRसंघाच्या धावसंख्येला आकार देण्याची जबाबदारी कर्णधार इयॉन मॉर्गन याच्यावर होती. मॉर्गन सुरुवातीला सावध फलंदाजी करताना पाहायला मिळाला. पण संघावर निर्माण झालेला दबाव नाहीसा करण्यासाठी मॉर्गन यानं जॉश हेजलवूड याच्या शॉर्ट पिच चेंडूवर लाँग ऑनच्या दिशेनं मोठा फटका मारला. लाँग ऑनवर चेन्नईचा अव्वल दर्जाचा फिल्डर फॅफ ड्यू प्लेसिस सीमारेषेजवळ होता.  फॅफनं चेंडूचा अंदाज घेत अतिशय हुशारीनं सीमारेषेबाहेर जाणारा चेंडू अतिशय अलगदपणे टिपला आणि मॉर्गनला माघारी धाडलं. याच व्हिडीओत त्याच्या गुडघ्यातून वाहणारे रक्तही स्पष्टपणे दिसतंय.

पाहा व्हिडीओ..  

कोलकाताकडून राहुल त्रिपाठीनं याही सामन्यात आपला फॉर्म कायम ठेवत ३३ चेंडूत ४५ धावांची खेळी साकारली. यात १ षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. तर नितीश राणानं २७ चेंडूत नाबाद ३७ धावांची खेळी साकारली. अखेरच्या दोन षटकांमध्ये दिनेश कार्तिकनं विस्फोटक फलंदाजी केली. कार्तिकनं ११ चेंडूत २६ धावा केल्या. यात एक षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. चेन्नईकडून शार्दुल ठाकूर यानं ४ षटकांमध्ये २० धावा देत दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या.  

टॅग्स :आयपीएल २०२१एफ ड्यु प्लेसीसचेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App