Join us  

IPL 2021, CSK vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पाँटिंग अम्पायरच्या निर्णयावर खवळला, जाब विचारायला अंगावर धावला

IPL 2021, Delhi Capitals vs Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सनं १३५ धावा करूनही दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. १८व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर CSKच्या बदली खेळाडूनं केलेली चूक DCच्या पथ्यावर पडली अन् बाजी पलटली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 11:52 PM

Open in App

IPL 2021, Delhi Capitals vs Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सनं १३५ धावा करूनही दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. १८व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर CSKच्या बदली खेळाडूनं केलेली चूक DCच्या पथ्यावर पडली अन् बाजी पलटली. शार्दूल ठाकूरनं १५व्या षटकात दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत सामना चेन्नईच्या तराजूत झुकवला होता, परंतु त्या एका चूकीनं गेम पलटला. दिल्लीनं सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलच्या टॉप टूमध्ये स्थान पटकावले. आता तर ते २० गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. याच सामन्याच्या अखेरच्या षटकात नाट्यमय प्रसंग घडला आणि त्यामुळे दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग ( Ricky Ponting) चांगलाच संतापला. 

सलामीवीर फेल, तर सर्वच अवघड होऊन बसेल, याची प्रचिती आज चेन्नईला आलीच असेल. आतापर्यंतच्या सामन्यात चेन्नईच्या धावसंख्येचा मोठा भार खांद्यावर उचलणारे दोन शिलेदाज आज अपयशी ठरले.  फॅफ ड्यू प्लेसिस (१०) व ऋतुराज गायकवाड ( १३ ) ही जोडी पहिल्यांदा पॉवर प्लेमध्ये माघारी परतली. महेंद्रसिंग धोनी व अंबाती रायुडू यांनी चेन्नईचं विकेट पडणे थांबवले, परंतु त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी त्यांना जखडून ठेवले.  अखेरच्या षटकात आवेश खाननं ही भागीदारी तोडताना २७ चेंडूंत १८ धावा करणाऱ्या धोनीला बाद केले. चेन्नईला ५ बाद १३६ धावांवरच समाधान मानावे लागले. रायुडू ४३ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला. 

पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी झटपट २४ धावा जोडल्या, परंतु दीपक चहरनं ही जोडी तोडली. पृथ्वी १८ धावांवर माघारी परतला. श्रेयस अय्यर ( २) व रिषभ पंत ( १५) हेही अपयशी ठरले. लक्ष्य मोठं नसल्यानं दिल्लीवर एवढं दडपण जाणवत नव्हते. पण, १५ व्या षटकात शार्दूल ठाकूरनं DCला दणके दिले. पहिल्या चेंडूवर त्यानं आर अश्विनला ( २) आणि  अखेरच्या चेंडूवर शिखरला ( ३९ धावा, ३५ चेंडू, ३ x ४, २ x 6 ) बाद करून दिल्लीची अवस्था ६ बाद ९९ अशी केली.  दिल्लीला तीन षटकांत २८ धावा करायच्या होत्या. तेव्हा धोनीनं त्याचा ट्रम्प कार्ड ड्वेन ब्राव्होला मैदानावर उतरवले. त्यानं अक्षर पटेलची विकेट घेतली खरी, परंतु CSKला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. 

नेमकं काय झालं?अखेरच्या षटकात ६ धावांची गरज असताना हेटमायरनं पहिल्याच चेंडूवर दोन धावा काढल्या. पुढील चेंडूवर धोनी यष्टींजवळ येऊन उभा राहिला, परंतु ब्राव्होच्या Wide चेंडूवर दिल्लीला दोन धावा मिळाल्या. तो चेंडू डायरेक्ट यष्टींमागे पडल्यामुळे तो नो बॉल असावा अशी रिकी पाँटिंगची मागणी होती आणि ती रास्तही होती. पण, अम्पायरनं Wide बॉल दिल्यामुळे पाँटिंग भडकला अन् सीमारेषेवर उभ्या असलेल्या अम्पायरकडे दाद मागू लागला.

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App