Join us  

IPL 2021 : CSK vs DC T20 Live : पृथ्वी शॉचा सॉलिड शो; ७२ धावांच्या खेळीत अवघ्या ११ चेंडूंत ५४ धावांचा पाऊस 

IPL 2021 : CSK vs DC  T20 Live Score Update : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) ठेवलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सहज शक्य नाही, असे वाटत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 10:44 PM

Open in App

IPL 2021 : CSK vs DC  T20 Live Score Update : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) ठेवलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सहज शक्य नाही, असे वाटत होते. पण, पृथ्वी शॉ ( Prithvi shaw) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) ज्या पद्धतीनं खेळले, त्यांनी दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) विजयाचा मजबूत पाया रचला. पृथ्वीनं घरच्या मैदानावर खेळताना चेन्नईच्या ( CSK) गोलंदाजांची धुलाई केली. कोणतीही घाई नाही, आक्रसताळेपणा नाही फक्त टायमिंगवर फटके मारताना त्यानं चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. पृथ्वीनं पहिल्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली. ड्वेन ब्राव्हेनं ही भागीदारी मोडली. 

सुरेश रैनानं ( Suresh Raina) दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) गोलंदाजांची वाट लावली. CSKचे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर सुरेश रैनानं तिसऱ्या व चौथ्या विकेटसाठी अनुक्रमे मोईन अली व अंबाती रायुडू यांच्यासह अर्धशतकी भागीदारी करताना CSKचा डाव सावरला. सुरेश रैना व मोईन अली या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३८ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी करून चेन्नईची गाडी रुळावर आणली. अली २४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ३६ धावांवर माघारी परतला.  IPL 2021 : CSK vs DC T20 Live Score Update

अंबाती रायुडू १६ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह २३ धावांवर माघारी परतला. १६व्या षटकात रैना रन आऊट झाला. त्यानं ३६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारासह ५४ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनी शून्यावर बाद झाला. रवींद्र जडेजा व सॅम कुरन यांनी अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी करताना चेन्नईला मोठी मजल मारू दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना चेन्नईला २० षटकांत ७ बाद १८८ धावा करून दिल्या. सॅम १५ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३४ धावा चोपून माघारी परतला. जडेजा १७ चेंडूंत ३ चौकारांसह २६ धावांवर नाबाद राहिला. 

पृथ्वी शॉ-शिखर धवन यांची सॉलिड सुरूवातघरच्या मैदानावर खेळणाऱ्या पृथ्वी शॉनं कोणतीच घाई न करता चेंडूला केवळ दिशा देण्याचं काम केलं. विजय हजारे ट्रॉफीतील फॉर्म कायम राखताना त्यानं चेन्नईच्या गोलंदाजांनाही हतबल केलं. पृथ्वीला जीवदान देण्याची चूक CSKला महागात पडली. दोन्ही खेळाडू अगदी सहजतेनं CSKच्या गोलंदाजांचा समाचार घेत होते, कोणताच आक्रमकपणा त्यांच्या फटक्यात नव्हता, होतं फक्त टायमिंग... दोन जीवदान मिळालेल्या पृथ्वीनं २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. शिखर धवननेही ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. 

दिल्ली कॅपिटल्ससाठी ६९ डावानंतर पहिल्या विकेटसाठी पहिलीच शतकी भागीदारी ठरली. यापूर्वी २०१६मध्ये क्विंटन डी कॉक व रिषभ पंत यांनी गुजरात लायन्सविरुद्ध ११५ धावा चोपल्या होत्या. 

२००८नंतर प्रथमच दिल्लीच्या दोन्ही सलामीवीरांनी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ५०+ धावा केल्या.  गौतम गंभीर व वीरेंद्र सेहवाग यांनी २००८मध्ये हा पराक्रम केला होता.  IPL 2021 latest news, CSK vs DC IPL Matches

पृथ्वी शॉ ३८ चेंडूंत ७२ धावांवर माघारी परतला आणि त्यात ९ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता. 

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सपृथ्वी शॉदिल्ली कॅपिटल्सशिखर धवन