Join us  

IPL 2021: न्यूडल्स विकणाऱ्याला IPL ने केले मालामाल; रातोरात झाला लखपती

IPL 2021: गोपाळ प्रसादला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. त्याने कधीही विचार केला नव्हता की एवढी मोठी रक्कम तो जिंकेल. त्याने टीम बनविण्यास सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 12:23 PM

Open in App

जर तुम्ही रातोरात लखपती झाला तर कसे वाटेल? जर तुम्हाला कोणी लाखो रुपये देत असेल तर तुम्हाला कसे वाटेल... हा आनंद तुम्ही शब्दांत व्यक्त करू सकत नाही. असाच एक प्रकार झारखंडच्या लातेहारमध्ये घडला आहे एका न्यूडल्स विकणाऱ्यासोबत. (chowmein seller became lakhpati after make team in IPL 2021.)

न्यूडल्स विकणाऱ्याने फँटसी गेम अॅपवर आयपीएलची टीम बनविली होती. यामध्ये तो थोडे थोडके नव्हे तर 57 लाख रुपये जिंकला आहे. त्यामध्ये निवडलेल्या खेळाडूंच्या प्रदर्शनावर पॉईंट दिले जातात आणि त्यावर किती पैसे जिंकले ते कळतात. मीडिया रिपोर्टनुसार लातेहारचया ठाणे चौक भागात गोपाल प्रसाद नावाच्या न्यूडल्स विकणाऱ्याचे नशीब फळफळले आहे. ‘प्रभात खबर’ शी बोलताना गोपाल प्रसाद याने सांगितले की, त्याने 35 रुपये लावून टीम बनविली होती. या स्पर्धेत 55 लाख लोकांनी सहभाग घेतला होता. त्याने गेल्या वर्षीपासून आयपीएलवर टीम बनविण्यास सुरुवात केली होती. 

गोपाळ प्रसादला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. त्यांनी शौक म्हणून फँटसी गेम अॅपवर पैसे लावण्यास सुरुवात केली. त्याने कधीही विचार केला नव्हता की एवढी मोठी रक्कम तो जिंकेल. त्याने टीम बनविण्यास सुरुवात केली. गोपाळला जेव्हा 57 लाख रुपये मिळाले, तेव्हा ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी त्याचा सत्कार केला. यानंतर त्याच्या न्यूडल्स शॉपवर शुभेच्छा देण्यासाठी आणि कसे खेळतो यावर टिप्स घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या. या पैशातून तो त्याचे दुकान विकसित करणार आहे.

(टीप: या खेळामध्ये आर्थिक जोखिम असल्याने आपापल्या जबाबदारीवर हा खेळ खेळावा.)

टॅग्स :आयपीएल २०२१
Open in App