Join us  

IPL 2021 : Delhi Capitals Quarantine: दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून मोठी अपडेट्स, रहावं लागेल क्वारंटाईन!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वासाठी आजचा दिवस हा घडामोडींचा राहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 9:55 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वासाठी आजचा दिवस हा घडामोडींचा राहिला आहे. सकाळी कोलकाता नाईट रायडर्सच्या ( KKR) दोन खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह... त्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव अन् आता दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. बीसीसीआयनं दिल्ली कॅपिटल्सच्या ( DC) संपूर्ण संघाला विलगीकरणात जाण्याची सूचना केली आहे. Cricbuzz च्या वृत्तानुसार बीसीसीआयनं DCचे सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफला विलगीकरणात जाण्यास सांगितले आहे, कारण २९ एप्रिलला DCनं कोलकाताविरुद्ध सामना खेळला होता. दिल्लीचा संघ सध्या अहमदाबाद येथे आहे.  मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स यांचे पुढील दोन दिवसाचे सामनेही होऊ शकतात स्थगित; समोर आलं मोठं कारण

''आम्ही आमचा मागचा सामना KKRविरुद्ध खेळला आहे, त्यामुळे आम्हा सर्वांना क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे आणि आता आम्ही सर्व विलगीकरणात आहोत. आम्ही सर्व प्रत्येकाच्या खोलीत आहोत,''असे दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकाऱ्यांनी Cricbuzzला सांगितले. क्वारंटाईन कालावधी किती असेल हे अद्याप माहित नाही, परंतु दिल्लीच्या खेळाडूंना सराव करण्यासाठीची परवानगी मिळेल, याचीही शक्यता कमीच आहे.  ''आम्हाला सराव सत्र होणार की नाही, याबाबतही काहीच सांगण्यात आलेले नाही,''असेही त्यांनी सांगितले. बीसीसीआयनं ७००-८०० कोटींची मदत करायला हवी, भारतीयांचे ऋण फेडण्याची हीच ती वेळ - ललित मोदी

टॅग्स :आयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्स