Join us  

IPL 2021 Venue : आयपीएलचे सामने मुंबईत होणार; IPL चेअरमन अन् BCCI सदस्यांनी घेतली शरद पवारांची भेट अन्... 

IPL 2021 Venue : आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल, बीसीसीआयचे सीईओ हेमांग आमीन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या काही सदस्यांनी बुधवारी ...

By स्वदेश घाणेकर | Published: March 06, 2021 9:52 AM

Open in App

IPL 2021 Venue : आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल, बीसीसीआयचे सीईओ हेमांग आमीन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या काही सदस्यांनी बुधवारी BCCIचे माजी अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांची भेट घेतली. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातील सामन्यांचे मुंबईत आयोजन करण्यात परवानगी मिळावी, यासाठी ही भेट घेण्यात आली होती. त्या बैठकीत पवारांनी आयपीएल प्रतिनिधींना महाराष्ट्र सरकारकडून शक्य ती सर्व मदत मिळेल, असे आश्वासन दिले. ( Pawar assured the IPL delegation that the state government of Maharashtra would extend all possible support)  वीरेंद्र सेहवागची आतषबाजी, 15 चेंडूंत 70 धावा; सचिन तेंडुलकरसह 10.1 षटकांत जिंकला सामना

आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी अवघ्या महिन्याभराचा कालावधी आहे आणि BCCIनं अजूनही वेळापत्रक जाहीर केलेले नाही. बीसीसीआयनं यापूर्वी कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली यांच्यासह मुंबईची आयपीएल सामन्यांसाठी निवड केली होती. राज्य सरकारच्या परवानगीनंतर मुंबईबद्दल अंतिम निर्णय होईल, असेही त्यावेळी बीसीसीआयकडून सांगण्यात आले होते. महाराष्ट्र व मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा काही निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. अशात मुंबईत आयपीएल सामने होणार नसल्याची शक्यता कमी होती. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय व आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त cricbuzz ने दिले आहे.   टीम इंडिया जागतिक कसोटीच्या अंतिम सामन्यात खेळल्यास BCCIला घ्यावा लागेल मोठा निर्णय

या बैठकीत प्रेक्षकांना परवानगी द्यायची की नाही, यावरही चर्चा झाली. ''अहमदाबाद किंवा चेन्नई प्रमाणे ५० टक्के चाहत्यांना परवानगी मिळावी, हा मुद्दा चर्चिला गेला,''असे एका सदस्यानं cricbuzz ला सांगितले.  आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या मान्यतेनंतर आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, पंरतु अद्याप बैठकीची तारीख ठरलेली नाही. येत्या काही दिवसांत गव्हर्निंग काऊंसिलची बैठकी होण्याची शक्यता आहे.  आयपीएल सामन्यांच्या ठिकाणांवरून फ्रँचायझी नाराज; मुख्यमंत्र्यांची BCCIकडे विनंती 

हैदराबाद, जयपूर आणि मोहाली यांच्याकडून दबावहैदराबाद, जयपूर आणि मोहाली या शहरांचा आयपीएल सामन्यांसाठी विचार करण्यात यावा, यासाठी बीसीसीआयवर दबाव वाढत आहे. सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या तीनही फ्रँचायझींनी बीसीसीआयला पत्र पाठवून दबाव वाढवला आहे. पंजाब किंग्सचे सह-मालक नेस वाडिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ''मी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी याआधीही बोललो आहो आणि चंडीगढ येथे सामने खेळवावेत अशी विनंती केली आहे,''असे वाडिया यांनी सांगितले. 

टॅग्स :आयपीएलबीसीसीआयशरद पवार