Join us  

IPL 2020 Players List : आयपीएलमधल्या कोणत्या खेळाडूंना संघात ठेवले कायम, जाणून घ्या...

IPL 2020 Auction : आतापर्यंत कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवण्यात आले आहे, ते जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 12:23 PM

Open in App

मुंबई : : इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020 च्या मोसमासाठी १९ डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव होणार आहे. तत्पूर्वी प्रत्येक संघाला आपापल्या कायम ठेवलेल्या आणि करारमुक्त खेळाडूंची अंतिम यादी जाहीर करायची होती. त्यानुसार आज अंतिम मुदत संपण्यापूर्वी आठही संघांनी लिलावातील गणिताची जुळवाजुळव करत काहींना मुक्त केले, तर अनेकांना कायम राखले. अशी आकडेमोड करून संघांनी आपापल्या खात्यात जास्तीची रक्कम शिल्लक राखण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवण्यात आले आहे, ते जाणून घ्या...

मुंबई इंडियन्स : आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, इशान किशन, जसप्रीत बुमरा, जयंत यादव, किरॉन पोलार्ड, कृणाल पंड्या, लसिथ मलिंगा, मिशेल मॅक्लेनाघन, क्विंटन डिकॉक, राहुल चाहर, रोहित शर्मा, शेफरेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट.

चेन्नई सुपरकिंग्स : महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायुडू, आसिफ केएल, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फॅफ ड्यू प्लेसिस, हरभजन सिंग, इम्रान ताहिर, जगदीशन नारायण, कर्ण शर्मा, केदार जाधव, लुंगी नगिडी, मिशेल सेंटनर, मोनू सिंह, मुरली विजय, रवींद्र जडेजा, रितुराज गायकवाड़, शेन वॉटसन, शार्दुल ठाकुर, सुरेश रैना.

दिल्ली कॅपिटल्स : अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्षर पटेल, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, कीमो पॉल, पृथ्वी शॉ, रविचंद्रन अश्विन, रिषभ पंत, संदीप लामिछाने, शिखर धवन, श्रेयस अय्यर.

किंग्स इलेव्हन पंजाब : मयांक अग्रवाल, अर्शदीप सिंग, ख्रिस गेल, दर्शन नालकंडे, गौतम कृष्णप्पा, हर्ड्स विल्जोन, हरप्रीत बरार, जगदीश सुचित, करुण नायर, केएल राहुल, मंदीप सिंह, मोहम्मद शमी, मुजीब जादरान, मुरुगन अश्विन, निकोलस पूरन, सर्फराज खान.

कोलकाता नाइट रायडर्स : आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, हॅरी गुर्ने, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नीतिश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नरीन.

राजस्थान रॉयल्स : अंकित राजपूत, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, महीपाल लोमरोर, मनन वोहरा, मयंक मार्कंडेय, राहुल तेवतिया, रियान पराग, संजू सैमसन, शशांक सिंह, श्रेयस गोपाल, स्टीव स्मिथ, वरुण आरोन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : एबी डिव्हिलिअर्स, देवदत्त पड्डीकल, गुरुकीरत सिंह, मोइन अली, मुहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, विराट कोहली, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल.

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, बासिल थंपी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टेनलेक, डेव्हिड वार्नर, जॉनी बेयरस्टो, केन विल्यम्सन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, रशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर, वृद्धिमान साहा.

 

पण आता त्यांची खरी कसरत लागणार आहे. बजेटमध्ये त्यांनी उर्वरित संघ पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. आता सर्व संघांचे मिळून २०७.६५ कोटी रक्कम बजेट मध्ये आहेत. पण लिलावात चेन्नई सुपर किंग्सला केवळ पाचच खेळाडू घेता येतील. कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांना प्रत्येकी ११ खेळाडू घ्यायचे आहेत. 

किती बजेट मध्ये किती खेळाडूचेन्नई सुपर किंग - १४.६ कोटी - ५ खेळाडू ( २ परदेशी)दिल्ली कॅपिटल्स - २७. ८५ कोटी - ११ खेळाडू ( ५ परदेशी) किंग्ज इलेव्हन पंजाब - ४२.७ कोटी - ९ खेळाडू ( ४ परदेशी)कोलकाता नाइट रायडर्स - ३५.६५ कोटी - ११ खेळाडू ( ४ परदेशी)राजस्थान रॉयल्स - २८.९ कोटी- ११ खेळाडू ( ४ परदेशी)मुंबई इंडियन्स- १३.०५ कोटी - ७ खेळाडू ( २ परदेशी)सनरायझर्स हैदराबाद - १७ कोटी - ७ खेळाडू ( २ परदेशी)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २७.९ कोटी - १२ खेळाडू ( ६ परदेशी).

टॅग्स :आयपीएल 2020आयपीएल लिलाव 2020आयपीएल