IPL 2020: आरसीबीच्या यशामध्ये मोलाची ठरली वॉशिंग्टनची ‘सुंदर’ कामगिरी

IPL 2020 RCB Washington Sundar: धावसंख्येला लगाम घालून प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव आणण्याची रणनीती यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 02:25 PM2020-10-13T14:25:41+5:302020-10-13T14:28:03+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 Washington sundar playing key role in royal challengers bangalore success | IPL 2020: आरसीबीच्या यशामध्ये मोलाची ठरली वॉशिंग्टनची ‘सुंदर’ कामगिरी

IPL 2020: आरसीबीच्या यशामध्ये मोलाची ठरली वॉशिंग्टनची ‘सुंदर’ कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (Royal Challengers Banglore) जबरदस्त कामगिरी करताना सर्वांचे अंदाज चुकवत गुणतालिकेत तिसºया स्थानी झेप घेतली. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) एकतर्फी विजय मिळवत आरसीबीने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. आरसीबीच्या ताफ्यात धडाकेबाज फलंदाज आहेत, मात्र त्यांनी हे यश मिळवले आहे ते गोलंदाजांच्या जोरावर. त्यातही एक गोलंदाज असा आहे, ज्याने सातत्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडवून ठेवले आणि यामुळेच आरसीबीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. हा गोलंदाज म्हणजे वॉशिंग्टन सुंदर (Washington Sunder). सातत्याने करत असलेल्या ‘सुंदर’ कामगिरीच्या जोरावर वॉशिंग्टन आरसीबीसाठी ट्रम्प कार्ड ठरत आहे.

आकडेवारीवर नजर टाकल्यास यंदाच्या सत्रात वॉशिंग्टनच्या खात्यात ७ सामन्यांतून केवळ ५ बळी दिसून येतील. मात्र त्याचवेळी त्याने ४.९० इतकी जबरदस्त इकोनॉमी रेट राखला आहे आणि हेच आरसीबीसाठी निर्णायक ठरले आहे. सातत्याने अचूक टप्प्यावर मारा करत वॉशिग्टनने फलंदाजांना आक्रमतेपासून दूर ठेवले. यामुळे आलेल्या दबावात फलंदाजांनी आपल्या विकेट फेकल्या आहेत.

कोलकाताविरुद्धही शारजाहच्या लहान मैदानावर वॉशिंग्टनने टिच्चून मारा करताना 4 षटकांत केवळ २० धावांत नितिश राणा आणि इयॉन मॉर्गन या मोठ्या फलंदाजांना बाद केले. तसेच आरसीबीविरुद्ध यंदा किंग्ज ईलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्सने २०० हून अधिक धावा फटकावल्या. या दोन्ही सामन्यांतही वॉशिंग्टनने कमी धावा दिल्या होत्या. सध्या फॉर्ममध्ये असलेल्या मुंबईच्या फलंदाजांनीही वॉशिंग्टनची गोलंदाजी सांभाळून खेळली होती.
यामुळे आरसीबीच्या यशामध्ये वॉशिंग्टनचे योगदान किती मोलाचे ठरले आहे हे दिसून येते. केवळ गोलंदाजीच नाही, तर फलंदाजीतही त्याच्याकडे आक्रमक फटके खेळण्याची क्षमता आहे. काही सामन्यात संघाने वॉशिंग्टनला अष्टपैलू शिवम दुबेच्या आधी फलंदाजीलाही पाठविले आहे. त्यामुळेच आगामी सामन्यातही वॉशिंग्टनच्या कामगिरीत सातत्य राहिले, तर नक्कीच आरसीबीसाठी अंतिम फेरी गाठणे कठीण जणार नाही.

Web Title: IPL 2020 Washington sundar playing key role in royal challengers bangalore success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.