Join us

IPL 2020 : "विराट कोहलीचा संघ प्लेऑफमध्ये खेळण्याच्या योग्यतेचा नव्हता"

Virat Kohli News : कसाबसा प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या विराटच्या नेतृत्वाखालील RCBचा संघ एलिमिनेटर लढतीत पराभूत होऊन स्पर्धेतून बाद झाला. या पराभवानंतर विराट कोहलीचे नेतृत्व आणि आरसीबीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले आहे.

By बाळकृष्ण परब | Updated: November 7, 2020 09:12 IST

Open in App
ठळक मुद्देविराट कोहलीच्या नेतृत्वावर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने केली जोरदार टीका रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये खेळण्याच्या योग्यतेचा नव्हताहा संघ फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर अपयशी ठरला

नवी दिल्ली - आयपीएल २०२० मध्ये काल रात्री झालेल्या एलिमिनेटर लढतीत सनरायझर्स हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर दणदणीत विजय मिळवत क्वालिफायर-२ लढतीती स्थान मिळवले. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला चांगली कामगिरी करणाऱ्या आरसीबीला स्पर्धेच्या उत्तरार्धात उतरती कळा लागली. कसाबसा प्लेऑफसाठी पात्र ठरलेला विराटच्या नेतृत्वाखालील हा संघ एलिमिनेटर लढतीत पराभूत होऊन स्पर्धेतून बाद झाला. या पराभवानंतर विराट कोहलीचे नेतृत्व आणि आरसीबीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले आहे.सनरायझर्स हैदराबादकडून पराभूत झालेल्या आरसीबीवर आणि कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने जोरदार टीका केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये खेळण्याच्या योग्यतेचा नव्हता, असे विधान गंभीरने केले आहे. हैदराबाद विरुद्धच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना आरसीबीला २० षटकांत केवळ १३१ धावाच करता आल्या. त्यानंतर केन विल्यमसनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने हा सामना सहा विकेट्सनी जिंकला होता.या पराभवाबाबत गंभीर म्हणाला की, तुम्ही विराटच्या संघाचा कितीही बचाव केला तरी माझ्या मतानुसार आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये जाण्याच्या योग्यतेचा नव्हता. हा संघ फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर अपयशी ठरला. गोलंदाजांनी थोडीफार चांगली कामगिरी केली. जर नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराजसारखे गोलंदाज शेवटची दोन षटके टाकत असतील आणि तुम्हाला १८-१९ धावांचा बचाव करायचा असेल तेसुद्धा जागतिक दर्जाच्या फलंदाजासमोर तर ते कठीण आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघामधील अडचणी ह्या सपोर्ट स्टाफ, मॅनेजमेंट आणि लीडरशिपपासून आहेत. जोपर्यंत पराभवासाठी कर्णधाराला जबाबदार धरले जाणार नाही तोपर्यंत असेच होत राहणार आहे. या संघाचा प्रशिक्षक दरवर्षी बदलला जातो. मात्र खरं दुखणं दुसरीकडेच आहे, असेही गंभीर म्हणाला.माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीसुद्धा बंगळुरूच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, आरसीबीची मोठी अडचण म्हणजे हा संघ पाच सामने जिंकतो. नंतर पाच सामने हरतो. प्लेऑफमध्ये प्रवेश करणे ही काही मोठी गोष्ट नाही. इथे आठ पैकी चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतात. ५० टक्के संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळते.

 

टॅग्स :विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरIPL 2020