Join us  

IPL 2020 : KKR च्या या मिस्ट्री स्पिनरने १७ व्या वर्षी सोडलं होतं क्रिकेट, आता संधी मिळताच वॉर्नरची घेतली विकेट

या लढतीत कोलकात्याच्या संघातील मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीची गोलंदाजी चर्चेचा विषय ठरली होती. वरुण चक्रवर्तीने टिच्चून मारा करत हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा महत्त्वपूर्ण बळी मिळवला.

By बाळकृष्ण परब | Published: September 27, 2020 12:35 PM

Open in App
ठळक मुद्देवरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीमधील ताकद ही त्याची मिस्ट्री गोलंदाजी आहेतो एकाच षटकात एकाच षटकात वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकतो२०२० मध्ये झालेल्या आयपीएल लिलावावेळी कोलकाता नाइटरायडर्सने वरुण चक्रवर्तीला ४ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले

अबुधाबी - आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या लढतीत कोलकाता नाईटरायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर मात केली. दरम्यान, या लढतीत कोलकात्याच्या संघातील मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीची गोलंदाजी चर्चेचा विषय ठरली होती. हैदराबादविरुद्धच्या लढतीसाठी संघात मिळालेल्या स्थानाचा पुरेपूर लाभ वरुण चक्रवर्तीने उठवला आणि टिच्चून मारा करत हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा महत्त्वपूर्ण बळी मिळवला. या लढतीत लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीची क्रिकेटमधील वाटचालसुद्धा तितकीच रंजक आहे.वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीमधील ताकद ही त्याची मिस्ट्री गोलंदाजी आहे. तो एकाच षटकात एकाच षटकात वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकतो. २०१९ मध्ये तामिळनाडू प्रीमियर लीगदरम्यान, पृथ्वी शॉ प्रकाशझोतात आला होता. त्यावेळी त्याने पाचपेक्षा कमी धावा देत नऊ बळी टिपले होते. त्यामुळेच २०१९ च्या आयपीएलसाठी किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला तब्बल ८.४ कोटी रुपये मोजून खरेदी केले होते. मात्र पंजाबने त्याला एकाच सामन्यात खेळवले होते.दरम्यान, २०२० मध्ये झालेल्या आयपीएल लिलावावेळी कोलकाता नाइटरायडर्सने वरुण चक्रवर्तीला ४ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. काल त्याला संघात स्थान मिळाले आणि त्यानेही ४ षटकांत २५ धावा देत एक महत्त्वपूर्ण बळी टिपला.मिस्ट्री स्पिनर म्हणून नावारूपाला आलेल्या वरुण चक्रवर्तीने वयाच्या १७ व्या वर्षी क्रिकेट सोडले होते. अभ्यास करण्यासाठी वरुणने क्रिकेटला रामराम ठोकला होता. १२ वी पास झाल्यानंतर वरुणने पाच वर्षांपर्यंत आर्किटेक्टचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने काही काळ नोकरीही केली. मात्र क्रिकेटवर जीव असलेल्या वरुणचे मन नोकरीत रमले नाही. अखेर वयाच्या २५ व्या वर्षी त्याने क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा पाऊल ठेवले आणि आता तो कोलकाता नाईटरायडर्सचा महत्त्वाचा मोहरा बनला आहे.काल झालेल्या लढतीसाठी कोलकाता नाईटरायडर्सच्या संघाने एक आश्चर्यकारक निर्णय घेताना फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संघात स्थान दिले होते. दरम्यान, वरूणनेही जबरदस्त गोलंदाजी करत आपल्यावर कर्णधार आणि संघव्यवस्थापनाने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले होते. त्याने हैदराबादचा कर्णधार डेव्हि वॉर्नरला स्वत:च्याच गोलंदाजीवर टिपत कोलकाता नाईटरायडर्सला मोठे यश मिळवून दिले होते. वॉर्नरने ३० चेंडून ३६ धावा फटकावल्या होत्या.

टॅग्स :IPL 2020कोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबादडेव्हिड वॉर्नर