दुबई - आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ आमने-सामने येत आहेत. दरम्यान, आज होणाऱ्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आजच्या लढतीचे वैशिष्ट्य म्हणजे दिल्लीच्या संघात कर्णधार श्रेसय अय्यर, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे यांच्यानंतर अजून एका मुंबईकर खेळाडूला स्थान मिळाले आहे. मुंबईकर क्रिकेटपटू तुषार देशपांडे आजच्या लढतीमधून दिल्लीकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे.२५ वर्षीय तुषार देशपांडेने आतापर्यंत २० प्रथमश्रेणी सामने खेळले असून, त्यात त्याने ५० बळी टिपले आहेत. तर २० ट्वेंटी-२० सामन्यांत ३१ बळी टिपले आहेत. तसेच तुषार देशपांडेने फलंदाजीमध्येही कमाल दाखवली आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2020 : टीम दिल्लीची, बोलबाला मुंबईचा; शॉ, अय्यर, रहाणेनंतर चौथा मुंबईकर संघात दाखल
IPL 2020 : टीम दिल्लीची, बोलबाला मुंबईचा; शॉ, अय्यर, रहाणेनंतर चौथा मुंबईकर संघात दाखल
Delhi Capitals Vs Rajasthan Royals News : आजच्या लढतीचे वैशिष्ट्य म्हणजे दिल्लीच्या संघात कर्णधार श्रेसय अय्यर, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे यांच्यानंतर अजून एका मुंबईकर खेळाडूला स्थान मिळाले आहे.
By बाळकृष्ण परब | Updated: October 14, 2020 19:53 IST