IPL 2020 SRH vs KXIP : वॉर्नर-बेअरस्टो यांची आतषबाजी; KXIP च्या गोलंदाजांचा पालापाचोळा 

कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी हैदराबाद संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. या दोघांनीही पावर-प्लेदरम्यान 58 धावांची खेळी केली. ही या पर्वातील हैदराबाद संघाची पावर-प्लेमधील सर्वाधिक धाव संख्या आहे. SRH vs KXIP Live Updates

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 8, 2020 09:42 PM2020-10-08T21:42:10+5:302020-10-08T21:46:00+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 srh vs kxip latest news sunrisers hyderabad  score 201 runs | IPL 2020 SRH vs KXIP : वॉर्नर-बेअरस्टो यांची आतषबाजी; KXIP च्या गोलंदाजांचा पालापाचोळा 

IPL 2020 SRH vs KXIP : वॉर्नर-बेअरस्टो यांची आतषबाजी; KXIP च्या गोलंदाजांचा पालापाचोळा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : आयपीएल टि-20 स्पर्धेच्या 13व्या पर्वातील 22वा सामना आज सनरायझर्स हैदराबादविरुद्धकिंग्स इलेव्हन पंजाबदरम्यान खेळला जात आहे. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर कर्णधार डेव्हिड वॉर्नर (52) आणि जॉनी बेअरस्टो (97) यांच्या तडाखेबाज शतकी भागीदारीच्या जोरावर हैदराबादने 201 धावा करत पंजाब समोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. SRH vs KXIP Live Updates  

वॉर्नर-बेअरस्टो यांच्यात 1000+ धावांची भागीदारी -
कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी हैदराबाद संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. या दोघांनीही पावर-प्लेदरम्यान 58 धावांची खेळी केली. ही या पर्वातील हैदराबाद संघाची पावर-प्लेमधील सर्वाधिक धाव संख्या आहे. याच बरोबर वॉर्नर आणि बेअरस्टो यांच्यात एकूण 16 डावांत एक हजारहून अधिक धानवांची भागीदारी झाली आहे. यादरम्यान या दोघांनीही  5 वेळा शतकी तर 5 वेळा अर्धशतकी भागीदारी केली आहे.

SRH vs  KXIP Latest News : डेव्हिड वॉर्नर-जॉनी बेअरस्टो जोडी जमली; IPLमध्ये 'असा' पराक्रम करणारी सातवी जोडी!

हैदराबादने आतापर्यंत जिंकले आहेत केवळ दोन सामने -
किंग्स इलेव्हन पंजाबला आतापर्यंत पाचपैकी चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. हा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. तर सनरायझर्सने हैदराबादने आतापर्यंत दोन सामने जिंकले असून तीन सामन्यांत त्याचा पराभव झाला आहे. गुणतालिकेत हा संघ सहाव्या स्थानावर आहे.

यावेळी, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13व्या पर्वाचे आयोजन भारता ऐवजी यूएईमध्ये करण्यात आले आहे. आतापर्यंत क्रिकेटच्या या प्रकारात फलंदाजांचा दबदबा बघायला मिळाला आहे. मात्र, या स्पर्धेत आतापर्यंत फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात बरोबरीचा सामना होताना दिसत आहे. या स्पर्धेत काही फलंदाजांनी शतकी खेळी केली आहे. तर काही गोलंदाजांनी अनेक वेळा आपल्या बळावर सामन्याचा रोख आपल्या संघाकडे वळवल्याचेही दिसून आले आहे.

IPL 2020 : ...तर अधिक रोमांचक होईल टी-20 क्रिकेट, सुनील गावसकरांनी दिला 'या' बदलांचा सल्ला

Web Title: IPL 2020 srh vs kxip latest news sunrisers hyderabad  score 201 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.