Join us

IPL 2020 : एबी डिव्हिलियर्सनं टोलावलेला चेंडू स्टेडियमबाहेर गेला अन् लहान मुलाला तो सापडला; RCBनं दिला सल्ला

RCBनं शारजाह स्टेडियमवर दणदणीत विजय मिळवला. एबी डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं.

By स्वदेश घाणेकर | Updated: October 13, 2020 16:35 IST

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) च्या प्ले ऑफच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्याच्या निर्धारानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) शारजाह स्टेडियमवर उतरले होते. पण, चाहत्यांना अपेक्षित असलेला चौकार-षटकारांचा पाऊस पडला नाही. एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांनी अखेरच्या षटकांत शतकी भागीदारी करून RCBला मोठा पल्ला गाठून दिला. त्यानंतर RCBच्या वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांनी KKRच्या फलंदाजांना तालावर नाचवले. निम्मा संघ ६४ धावांवर माघारी परतल्यानंतर आंद्रे रसेलही KKRचा पराभव टाळू शकला नाही. KKRच्या फलंदाजांना मॅच विनिंग भागीदारीच RCBच्या गोलंदाजांनी करू दिली नाही. 

देवदत्त पडीक्कल  ( ३२) आणि आरोन फिंच ( ४७) यांच्या दमदार सुरुवातीनंतर एबीनं ३३ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ७३, तर विराटनं नाबाद ३३ धावा करताना संघाला २ बाद १९४ धावांचे डोंगर उभे करून दिले. या दोघांनी ४७ चेंडूंत १०० भागीदारी केली. IPL मधील ही त्यांची १०वी शतकी भागीदारी ठरली. शिवाय दोघांनी ३००० धावांची भागीदारीचा विक्रमही नोंदवला. फलंदाजांच्या कामगिरीनंतर ख्रिस मॉरिस, सुंदर आणि चहल यांनी RCBच्या विजयात हातभार लावला. मॉरिस आणि सुंदरनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. चहलनं KKRचा कर्णधार दिनेश कार्तिकची महत्त्वाची विकेट घेताना ४ षटकांत १२ धावा दिल्या. चहलनं ७ सामन्यांत १० विकेट्स घेतल्या आहेत आणि ३ बाद १८ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.  KKRला कसेबसे २० षटकांत ९  बाद ११२ धावांपर्यंत मजल मारता आली. RCBनं हा सामना ८२  धावांनी जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आगेकूच केली. 

या सामन्यात एबीच्या ३६० डिग्री फटकेबाजीनं बरेच चेंडू स्टेडियमबाहेर गेले. त्यातल्या एका चेंडूंनं तर ट्राफीक अडवलं अन् एक चेंडू एका चिमुरड्याला सापडला. चिमुरड्याचा तो फोटो व्हायरल झाल्यानंतर RCBनं त्याला एक सल्ला दिला. ''हा चेंडू जपून ठेव. याचे मोल मोजता येणार नाही.''

टॅग्स :IPL 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्सएबी डिव्हिलियर्स