Join us  

IPL 2020: "ॠतुराज टॅलेंटेड आहे, पण त्याचा एक प्रॉब्लेमही आहे"; एम.एस धोनीचा खुलासा

IPL 2020, CSK vs KKR Match News: या सामन्यानंतर धोनीने ॠतुराजचे कौतुक करताना म्हटले की, ‘सध्या संधी न मिळालेल्या खेळाडूंना खेळविण्याचा आमचा प्रयत्न असून या खेळाडूंनी ही संधी साधावी अशी आमची अपेक्षा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 12:51 PM

Open in App

मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये आव्हान संपुष्टात आलेला चेन्नई सुपरकिंग्ज (ChennaiSuperkings) पहिला संघ. या संघाकडे गमावण्यासारखे काहीच नसल्याने, आता हा संघ अत्यंत धोकादायक बनला आहे. याचा प्रत्यत गुरुवारी आला तो कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders). प्ले ऑफच्या आशा कायम ठेवण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे अनिवार्य असलेल्या कोलकाताना सीएसकेला 6 गड्यांनी धक्का दिला. त्यामुळेच सीएसके अनेक संघांसाठी प्ले ऑफचे गणित बिघडवणारा संघ ठरु शकतो. कोलकाताविरुद्धच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला ॠतुराज गायकवाडचे )Ruturaj Gaikwad) चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) कौतुक केले, मात्र त्याचवेळी त्याचा एक प्रॉब्लेमही सांगितला.

कोलकाताने ५ बाद १७२ धावांची मजल मारल्यानंतर चेन्नईने अखेरच्या चेंडूवर बाजी मारली. धावांचा पाठलाग करताना चेन्नईने १ बाद ११८ अशी सुरुवात केली. यावेळी त्यांचा विजय सहजसोपा दिसत होता. मात्र पॅट कमिन्सने अंबाती रायुडूला (३८) बाद केल्यानंतर चेन्नईचा डाव घसरला. ॠतुराज गायकवाडने ५३ चेंडूंत ७२ धावा करत चेन्नईच्या विजयाचा पाया रचला. रायुडूनंतर महेंद्रसिंग धोनी व ॠतुराज ठराविक अंतराने बाद झाल्याने कोलकाताने पुनरागमन केले. मात्र, जडेजाने ११ चेंडूंत नाबाद ३१ धावांचा तडाखा देत कोलकाताच्या हातातील विजय खेचून आणला.

या सामन्यानंतर धोनीने ॠतुराजचे कौतुक करताना म्हटले की, ‘सध्या संधी न मिळालेल्या खेळाडूंना खेळविण्याचा आमचा प्रयत्न असून या खेळाडूंनी ही संधी साधावी अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही ॠतुराजला नेट्समध्य फलंदाजी करताना पाहिले होते, मात्र यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली. यानंतर त्याला स्थिरावण्यास 20 दिवस लागले. हे नक्कीच दुर्दैवी आहे, पण हे सत्र त्याच्यासाठी आठवणीत राहील.’ धोनी पुढे म्हणाला की, ‘तो सर्वाधिक गुणवत्ता असलेल्या खेळाडूंपैकी आहे. फक्त एक प्रॉब्लेम आहे, की तो जास्त बोलत नाही. यामुळे अनेकदा संघ व्यवस्थापनाला अडचणीचे ठरते. एकदा का तो स्थिरावला की, आपण पाहिले आहे, तो पाहिजे तिथे चेंडू भिरकावू शकतो.’ 

 

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्समहेंद्रसिंग धोनी