Join us  

IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सनं रहाणे, अश्विनला का घेतलं? प्रशिक्षक रिकी पाँटिंगनं दिलं उत्तर

अश्विन आणि अजिंक्य मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासून दूर आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 4:08 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 2020च्या लिलावासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. कोलकाता येथे आयपीएल 2020चा लिलाव होणार आहे. या लिलावापूर्वीच्या ट्रेड विंडोत दिल्ली कॅपिटल्स संघानं रवीचंद्रन अश्विन आणि अजिंक्य रहाणे या दोन प्रमुख खेळाडूंना अनुक्रमे किंग्ज इलेव्हन पंजाव आणि राजस्थान रॉयल्सनं आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. अश्विन आणि अजिंक्य यांना मागील मोसमात साजेशी कामगिरी करण्यात अपयश आलं. तरीही दिल्ली संघानं त्यांना का घेतलं, हा प्रश्न सर्वाना सतावत आहे. पण, दिल्ली संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगनं याच उत्तर दिलं आहे.

अश्विन आणि अजिंक्य मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासून दूर आहेत. पण, या दोन्ही खेळाडूंना फिरोज शाह कोटला स्टेडियमवर खेळण्याचा चांगला अनुभव आहे आणि त्यामुळेच या दोघांना संघात घेतल्याचं पाँटिंगनं सांगितले. तो म्हणाला,''कोटलाच्या खेळपट्टीवर हे दोघेही खेळाडू चांगली कामगिरी करतील आणि त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. त्यामुळे त्यांना आम्ही संघात दाखल करून घेतले. गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही याविषयी चर्चा करत होतो.''  

आयपीएल लिलावाबद्दल पाँटिंग म्हणाला,''जलदगती गोलंदाज विशेषतः परदेशी गोलंदाज घेण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. पॅट कमिन्स यावेळी भाव खाऊ शकतो. ख्रिस वोक्सही शर्यतीत आहे. त्याशिवाय ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मिचेल मार्श, जिमी नीशॅम, कॉलीन डी ग्रँडहोम हे अष्टपैलू खेळाडूही चांगली रक्कम घेतील. त्यामुळे लिलाव प्रक्रियेला जाण्यापूर्वी आम्ही संपूर्ण अभ्यास करूनच जाणार आहोत.''

टॅग्स :आयपीएल लिलाव 2020आयपीएल 2020दिल्ली कॅपिटल्सअजिंक्य रहाणेआर अश्विन