Join us  

IPL 2020 RCB vs DC: चॅलेंजर्स व कॅपिटल्सदरम्यान रंगतदार लढतीची अपेक्षा

IPL 2020 RCB vs DC: दोन्ही संघ कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 3:52 AM

Open in App

दुबई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आतपर्यंत प्रभावी कामगिरी करणारे दोन संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (आरसीबी) आणि दिल्ली कॅपिटल्स संघांदरम्यान सोमवारी खेळल्या जाणारी लढत रंगतदार होण्याची आशा आहे.आरसीबी व दिल्ली संघांनी चार सामन्यांतून प्रत्येकी तीन विजय मिळवले. आरसीबीचा विराट कोहली व दिल्लीचा श्रेयस अय्यर या लढतीत कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करण्यास उत्सुक आहेत. आरसीबीतर्फे युवा देवदत्त पडीक्कलने आतापर्यंत चार सामन्यांत तीन अर्धशतकांसह १७४ धावा केल्या आहेत. कोहलीला सूर गवसल्यामुळे एबी डिव्हिलियर्स व शिवम दुबे यांच्यावरील दडपण कमी होईल.वेदर रिपोर्ट-दिवसाचे तापमान ३७ डिग्री राहण्याची शक्यता. ह्युमिडिटी ५१ टक्के व वाऱ्याचा वेग २३ किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता.पीच रिपोर्ट-प्रथम फलंदाजी करणाºया संघाला लाभ मिळेल, कारण त्यानंतर खेळपट्टी संथ होत जाते. त्यामुळे फलंदाजी करणे कठीण होते.मजबूत बाजूदिल्ली। श्रेयस अय्यरचे कुशल नेतृत्व. पृथ्वी शॉ शानदार फॉर्मात आहे. मार्कस स्टोइनिस व शिमरोन हेटमायर यांच्यासारख्या आक्रमक फलंदाजांची उपस्थिती. वेगवान गोलंदाज नॉर्जे सुरुवातीला व डेथ ओव्हर्समध्ये यशस्वी.आरसीबी। कोहलीला गवसलेला सूर. देवदत्त पडीक्कलची शानदार कामगिरी. इसुरू उदाना व नवदीप सैनीची प्रभावी कामगिरी.कमजोर बाजूदिल्ली। सलामीवीर शिखर धवनचा हरवलेला फॉर्म. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा गेल्या लढतीत अपयशी.आरसीबी। फिरकीपटू झम्पा फॉर्ममध्ये नाही. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी कमकुवत.

टॅग्स :IPL 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहली