Join us

IPL 2020 : MS Dhoniवर भविष्यात कोणती जबाबदारी देणार? CSKचे मालक एन श्रीनिवासन यांची स्पष्ट भूमिका 

चेन्नई सुपर किंग्सला यंदा १४ सामन्यांपैकी केवळ ६ सामने जिंकता आले आणि त्यामुळे त्यांना गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

By स्वदेश घाणेकर | Updated: November 5, 2020 17:00 IST

Open in App

चेन्नई सुपर किंग्ससाठी ( Chennai Super Kings) यंदाची Indian Premier League (IPL 2020) काही चांगली राहिली नाही. IPLच्या इतिहासात प्रथमच महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) या संघाला प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवता आला नाही. धोनीची बॅटही यंदाच्या लीगमध्ये थंडावलेली पाहायला मिळाली. फॅफ ड्यू प्लेसिस, सॅम कुरन, रवींद्र जडेजा व ऋतुराज गायकवाड वगळता CSKच्या बहुतांश खेळाडूंनी निराशच केले. त्यामुळे IPL 2021साठी संघात बरेच बदल केले जातील, असे संकेत फ्रँचायझीनं दिले होते. कर्णधार धोनीनंही अखेरच्या साखळी सामन्यानंतर युवा खेळाडूंकडे जबाबदारी देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे स्पष्ट केले. त्यावरून धोनीच्या निवृत्तीच्या व कर्णधारपद सोडण्याच्य चर्चा सुरू झाल्या. CSKचे मालक एन श्रीनिवासन यांनी याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

चेन्नई सुपर किंग्सला यंदा १४ सामन्यांपैकी केवळ ६ सामने जिंकता आले आणि त्यामुळे त्यांना गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. धोनीला १४ सामन्यांत केवळ २०० धावा करता आल्या. फॅफ व अंबाती रायुडू यांनी अनुक्रमे ३५९ व ४४९ धावा केल्या. दीपक चहरनं १२ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजानं १४ सामन्यांत २३२ धावा व ६ विकेट्स घेतल्या. ऋतुराजनं ६ सामन्यांत २०४ धावा केल्या. त्यानं सलग तीन अर्धशतकं झळकावली आणि CSKकडून हा पराक्रम करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. सॅम कुरननं १८६ धावा व १३ विकेट्स घेतल्या. शेन वॉटसन २९९ धावा करू शकला आणि त्यानं IPL 2020तील अपयशानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

त्यामुळे धोनीही निवृत्ती घेऊन CSKच्या प्रशिक्षकाची किंवा अन्य महत्त्वाची जबाबदारी स्वीकारेल असे वाटले होते. पण, एन श्रीनिवासन यांनी धोनीच संघाचे नेतृत्व सांभाळेल हे स्पष्ट केले. ते म्हणाले,''धोनी संघाचा कर्णधार होता आणि तोच यापुढेही कायम राहील. धोनीने संघात बदलाची गरज असल्याचे सांगितले आहे आणि त्याचा नक्की काय हेतू होता हे मला माहिती आहे. या सर्व गोष्टींबाबत माझ्याशी चर्चा केली आहे.''

''एखादं वाईट वर्ष आलं तर खचायचं नसतं. पुढल्या वर्षी आम्ही दमदार कमबॅक करू याची मला खात्री आहे. ऋतुराज गायकवाडबाबत सांगायचं तर त्यात फॅफ ड्यू प्लेसिसने सांगितल्याप्रमाणे तरूणपणाच्या विराट कोहलीची झलक दिसते. ऋतुराज नक्कीच कोहलीसारखा यशस्वी होईल'',असेही श्रीनिवासन यांनी सांगितले. 

टॅग्स :IPL 2020महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स