Join us  

Big News : चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातील सदस्याला कोरोना; MS Dhoniचं टेंशन वाढलं

IPL 2020 : सर्व संघ दुबईत दाखल झाले आहेत आणि सहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून सरावालाही सुरुवात केली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 4:44 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल ) 13वे हंगाम सुरू होण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे, तरीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ( बीसीसीआय) वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. 19 सप्टेबंर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. आयपीएलसाठी सर्व संघ दुबईत दाखल झाले आहेत आणि सहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून सरावालाही सुरुवात केली आहे. पण, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) संघ पुन्हा क्वारंटाईन झाला आहे. त्यांच्या ताफ्यातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. (Members of CSK contingent test positive for Covid 19) 

IPL 2020 : क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून एकमेकांना भेटले RCBचे खेळाडू

अन्य संघांप्रमाणे शुक्रवारी चेन्नईचे खेळाडू सरावासाठी मैदानावर उतरणे अपेक्षित होते, परंतु खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधी वाढवण्यात आला. टाईम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दुबईत पोहोचल्यानंतर करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत CSKचा एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. हा सदस्य नेमका कोण याबाबत अद्याप सांगण्यात आलेले नाही. ही बातमी समोर आल्यानंतर आता सर्व सदस्यांची शुक्रवारी पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल शनिवारी समोर येईल.(Members of CSK contingent test positive for Covid 19)

Video : केव्हीन ओ'ब्रायननं खेचला असा षटकार की करून घेतलं स्वतःचं नुकसान

IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी; खेळाडूंसाठी नियमच बदलला 

''युरोपात फुटबॉलच्या सामन्यांची सुरूवात झाली, तेव्हाही काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानुसार आयपीएलमधील 8 फ्रँचायझींची 1000 हून अधिक सदस्य आहेत आणि येथेही तशी शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही संघासोबत असं घडू शकतं. सर्व प्रकारची खबरदारी घेतल्यानंतर आमचा एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळला, हे दुर्दैव म्हणावं लागेल,''असं सूत्रांनी सांगितले. (Members of CSK contingent test positive for Covid 19)

टॅग्स :आयपीएल 2020चेन्नई सुपर किंग्सकोरोना वायरस बातम्या