Join us  

IPL 2020 : यासाठी कुलदीप यादव बसला होता संघाबाहेर!

IPL 2020 : आतापर्यंत दोन सामन्यांत कुलदीप संघाबाहेर बसला असून यामागचे कारण आता समोर आले आहे. केकेआरचा गोलंदाजी प्रशिक्षक काइल मिल्सने कुलदीपला संघाबाहेर ठेवण्यामागचे कारण सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 6:14 PM

Open in App

मुंबई -  कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जला (Chennai Superkings) १० धावांनी नमवले. सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना केकेआरने शानदार विजय मिळवला. संघाच्या विजयात प्रत्येक खेळाडूने आपले योगदान दिले असले, तरी चाहत्यांना मात्र खटकली ती कुलदीप यादवची (Kuldeep Yadav) अनुपस्थिती. आतापर्यंत दोन सामन्यांत कुलदीप संघाबाहेर बसला असून यामागचे कारण आता समोर आले आहे. केकेआरचा गोलंदाजी प्रशिक्षक काइल मिल्सने कुलदीपला संघाबाहेर ठेवण्यामागचे कारण सांगितले.चेन्नईविरुद्धच्या सामन्यासाठी कुलदीपला केकेआरच्या अंतिम संघात स्थान मिळाले नाही आणि या निर्णयास मिल्सने एकदम योग्य निर्णय असल्याचे सांगितले. शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केकेआरने आपल्या गोलंदाजांच्या जोरावर चेन्नईविरुद्ध गमावलेला सामना जिंकला. अखेरच्या दहा षटकांमध्ये पुनरागमन करत केकेआरने चेन्नईच्या आव्हानातली हवा काढली.कुलदीप यादवला संघाबाहेर ठेवण्याबाबत मिल्सने म्हटले की, ‘या मैदानाचे आकार काहीसे लहान आहे आणि टीम कॉम्बिनेशन पाहून कुलदीपला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. संथ खेळपट्टीवर कुलदीप नक्कीच प्रभावी ठरला असता. कुलदीप जगातील सर्वोत्तम स्पिनर्सपैकी एक आहे, मैदानाचे आकार आणि संघाचे संतुलन पाहता जो अंतिम संघ निवडण्यात आला, त्यात कुलदीप बसत नव्हता.’आतापर्यंत कुलदीपने तीन सामन्यांतून केवळ 9 षटके गोलंदाजी केली आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नईविरुद्ध त्याला बेंचवर बसावे लागले. संघातच मोठी स्पर्धा असल्याचे सांगताना मिल्स म्हणाला की, ‘ही प्रतिस्पर्धा खूप चांगली आहे. आमचा संघ मोठा आहे आणि प्रतिस्पर्धा खूप तगडी आहे. कुलदीप भलेही दोन सामने बाहेर बसला आहे, मात्र तो अद्यापही संघात आहे आणि तो त्याचे योगदान देतोय. संघात एक संस्कृती आहे आणि प्रत्येकजण एकमेकांची मदत करत आहे.’ 

टॅग्स :कुलदीप यादवIPL 2020