IPL 2020: लोकेश राहुल म्हणतो, ‘कोहली-डीव्हिलियर्सवर बंदी घाला’; पण का?

IPL 2020 Ab De Villiers Virat Kohli: पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलनं केली विराट-एबीडीवर बंदी घालण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 02:43 PM2020-10-15T14:43:53+5:302020-10-15T14:44:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 KL Rahul wants IPL organisers to ban Virat Kohli and AB de Villiers | IPL 2020: लोकेश राहुल म्हणतो, ‘कोहली-डीव्हिलियर्सवर बंदी घाला’; पण का?

IPL 2020: लोकेश राहुल म्हणतो, ‘कोहली-डीव्हिलियर्सवर बंदी घाला’; पण का?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : Indian Premier League (IPL 2020) मध्ये असे काही खेळाडू आहेत, ज्यांचा धाक प्रत्येक संघाला असतो. या खेळाडूंमध्ये असलेली एकहाती सामना फिरवण्याची क्षमता, प्रत्येक संघासाठी टेन्शन आणणारी असते. त्यामुळेच एकतर या खेळाडूंनी लवकर बाद व्हावे किंवा खेळूच नये अशीच अपेक्षा प्रतिस्पर्धी संघांची असते. अशीच एक प्रतिक्रिया किंग्ज ईलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल (Lokesh Rahul) याने दिली असून राहुलने थेट विराट कोहली (Virat Kohli) आणि एबी डीव्हिलियर्सविषयी (Ab De villiers)  मत मांडताना या दोघांवर आयपीएलमध्ये बंदी घालण्यात यावी असेच म्हटले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि धडाकेबाज एबी डीव्हिलियर्स याचा धाक आयपीएलमध्ये कोणाला नाही, असा एकही संघ किंवा खेळाडू नाही. आयपीएलमधील सर्वोत्तम जोडी असलेल्या कोहली-डीव्हिलियर्स यांनी आरसीबीला अनेक सामने आपल्या जोरावर जिंकून दिले आहेत. यंदाच्या सत्रात आरसीबी चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी ७ पैकी ५ सामने जिंकले असून गुणतालिकेत ते सध्या तिसºया स्थानी आहेत.

बुधवारी झालेल्या इन्स्टाग्राम चॅटदरम्यान किंग्ज ईलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने कोहली-डीव्हिलियर्सप्रती असलेली भिती व्यक्त केली आणि मस्तीमध्ये त्याने या दोन्ही खेळाडूंवर बंदी घालावी असे म्हटले. या चॅटदरम्यान कोहलीने राहुलला प्रश्न केला होता की, ‘टी-२० किंवा आयपीएलमध्ये काय बदल करायला पाहिजे असं वाटतं?’ यावर राहुलने मस्करीमध्ये उत्तर दिलं की, ‘आयपीएल आयोजकांनी विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांना बॅन केले पाहिजे.’

राहुलने कोहलीला उत्तर दिले की, ‘सर्वात पहिले मला वाटतं की, आयपीएलला मी सांगेन की, त्यांनी तुम्हाला आणि एबी डीव्हिलियर्सवर पुढील वर्षासाठी बंदी घालावी. एकदा की धावांचा एका विशिष्ट पल्ला गाठला की, लोकांनी सांगितले पाहिजे की, आता बस झालं. एकदा की तुम्ही ५ हजार धावा पूर्ण केल्या की खूप झालं. आता तुम्ही इतर खेळाडूंना काम करायला दिले पाहिजे.’ 

Web Title: IPL 2020 KL Rahul wants IPL organisers to ban Virat Kohli and AB de Villiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.