Join us  

IPL 2020: हैदराबादला धक्का! ‘गेमचेंजर’ फलंदाज बसू शकतो संघाबाहेर

सामन्याआधीच कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता असलेला फलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर बसणार असल्याने हैदराबादला मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 12:50 PM

Open in App

मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मधील पहिला विजय मिळवण्याच्या निर्धाराने सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) आज कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) (केकेआर) आव्हानाला सामोरे जाईल. विशेष म्हणजे केकेआरलाही आपल्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागलेला असल्याने त्यांच्याकडूनही विजयासाठी पूर्ण प्रयत्न होतील. त्यामुळेच आजच्या सामन्यात तुंबळ लढाईची मेजवानीच क्रिकेटचाहत्यांना मिळेल. मात्र असे असले, तरी या सामन्याआधीच कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता असलेला फलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर बसणार असल्याने हैदराबादला मोठा धक्का बसला आहे.

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने आपल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याला बेंचवर बसविले होते. यामुळे त्याच्यावर टीकाही झाली होती. विलियम्सन खेळपट्टीवर टिकून राहून कोणत्याही क्षणी सामना फिरवण्यात तरबेज आहे. मात्र सामना संपल्यानंतर विलियम्सनला संघाबाहेर बसविण्याचे कारण समोर आले. दुखापतीमुळे विलियम्सन खेळू शकला नसल्याचे वॉर्नरने सांगितले होते. त्याचवेळी वॉर्नरने विलियम्सनची दुखापत गंभीर असल्याचेही म्हटले होते. अद्याप हैदराबाद संघाकडून विलियम्सनच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार कोलकाताविरुद्ध विलियम्सन खेळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट आहे. त्याचवेळी, पुढील दोन-तीन सामन्यांतही तो खेळणार नसल्याची माहिती मिळत आहे. विलियम्सनच्या अनुपस्थितीमध्ये हैदराबादची मधली फळी अत्यंत कमजोर भासते. त्यांच्याकडे तिसऱ्या क्रमांकावर भक्कम फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांचा सक्षम पर्याय नसल्यानेच विलियम्सनची दुखापत हैदराबादसाठी चिंतेची बाब ठरत आहे. 

टॅग्स :केन विलियम्सनIPL 2020सनरायझर्स हैदराबाद