IPL 2020 : भारतीय फलंदाजांची कमतरता भासली; सीएसकेच्या प्रशिक्षकांची प्रतिक्रिया

चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings) यंदाच्या Indian Premier League (IPL 2020)  सत्रात स्पर्धेबाहेर जाणारा पहिला संघ ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 07:35 PM2020-11-02T19:35:52+5:302020-11-02T19:36:29+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Indian batsmen's form was missing; CSK coache stephen fleming reaction | IPL 2020 : भारतीय फलंदाजांची कमतरता भासली; सीएसकेच्या प्रशिक्षकांची प्रतिक्रिया

IPL 2020 : भारतीय फलंदाजांची कमतरता भासली; सीएसकेच्या प्रशिक्षकांची प्रतिक्रिया

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings) यंदाच्या Indian Premier League (IPL 2020)  सत्रात स्पर्धेबाहेर जाणारा पहिला संघ ठरला. अखेरच्या सामन्यात त्यांनी किंग्ज ईलेव्हन पंजाबला (Kings XI Punjab) मोठ्या फरकाने नमवून नेट रनरेट वाढवला आणि गुणतालिकेतील अखेरचे स्थान टाळण्यात यश मिळवले. हाच एकमेव दिलासा सीएसकेला मिळाला. मात्र यंदाच्या सत्रात सुरुवातीपासूनच सीएसकेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यात प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती संघाला महागात पडली. त्यामुळेच सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही मान्य केले की, ‘भारतीय फलंदाजांची कमतरता आम्हाला खूप भासली.’

सीएसकेचा सर्वात भरवशाचा फलंदाज सुरेश रैना याने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच माघार घेतली होती. तसेच सलग तीन सामन्यांत अर्धशतक झळकावणारा ॠतुराज गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सुरुवातीच्या सामन्यांना मुकला होता.

पंजाबविरुद्ध विजय मिळवल्यानंतर फ्लेमिंग म्हणाले की, ‘संघचा ताळमेळ साधताना आम्हाला संघर्ष करावा लागला. खेळाडूंचे संघ सोडूने जाणे आणि कोरोनारस्त होणे आमच्यासाठी निराशाजनक ठरले. यामुळे संघाचा ताळमेळ साधण्यास अडचणी आल्या.’ संघाच्या कामगिरीबाबत फ्लेमिंग म्हणाले की, ‘आम्ही पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली, मात्र त्यानंतरचे दोन सामने खराब खेळलो. त्या दोन सामन्यांतून कळालेल्या कमजोरी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र त्यात आम्हाला यश मिळाले नाही. भारतीय खेळाडूंच्या कमतरतेमुळे आम्ही संघर्ष केला आणि ती कमतरता आम्ही आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.’  

Web Title: IPL 2020: Indian batsmen's form was missing; CSK coache stephen fleming reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.