Join us  

IPL 2020 : आता मी काहीच बोलण्याची गरज नाही; KKRचं कौतुक करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या ट्विटवर शाहरूख खानची प्रतिक्रिया

KKR vs RR सामना पाहण्यासाठी KKRचा सहमालक शाहरुख खान ( Shahrukh Khan) कुटुंबीयांसह दुबईत स्टेडियमवर उपस्थित होता. 

By स्वदेश घाणेकर | Published: October 01, 2020 4:16 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये बुधवारी कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders)ने   राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) संघाची विजयी घोडदौड रोखली. शुबमन गिल ( Shubman Gill), इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) यांच्या दमदार कामगिरीनंतर KKRच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना RRचा विजयरथ अडवला. शिवम मावी ( Shivam Mavi), वरुण चक्रवर्थी ( Varun Chakravarthi) आणि कमलेश नागरकोटी ( Kamlesh Nagarkoti) या युवा गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. हा सामना पाहण्यासाठी KKRचा सहमालक शाहरुख खान ( Shahrukh Khan) कुटुंबीयांसह दुबईत स्टेडियमवर उपस्थित होता. 

जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) टिच्चून मारा करताना KKRच्या धावगतीला वेसण घातलं होतं. मात्र, शुबमन गिल ( Shubman Gill) आणि इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) यांनी फटकेबाजी करून KKR संघाला 6 बाद 174 धावांपर्यंत मजल मारून दिली. शुबमननं 34 चेंडूंत 47 धावा केल्या. नितिश राणाने 17 चेंडूंत 22 धावा केल्या. मॉर्गननं 23 चेंडूंत नाबाद 34 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला 9 बाद 137 धावा करता आल्या. KKRनं 37 धावांनी विजय मिळवला. टॉम कुरन 36 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 54 धावा केल्या.   सामन्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यानं KKRच्या खेळाडूंचे कौतुक केले. पण, त्यानं महान फलंदाज सचिन तेंडुलकरचं ( Sachin Tendulkar) ट्विट रिट्विट करून एक मजेशीर प्रतिक्रिया दिली. सचिननं ट्विट केलं की,''शुबमन गिलची महत्त्वपूर्ण खेळी. त्यानं सुरेख फटकेबाजीही केली. आंद्रे रसेलची छोटेखानी खेळी आणि इयॉन मॉर्गननं अंतिम टप्प्यात केलेल्या धावेमुळे KKRनं समाधानकारक पल्ला गाठला. KKRच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. त्यांनी सांघिक खेळाचे दर्शन घडवले. नागरकोटीचा अफलातून झेल, तो कसा विसरेन.''  सचिनचं ट्विट रिट्विट करून शाहरुख खान म्हणाला,''आता मी काही बोलायची गरज नाही. KKR आणि खेळाडू हा कौतुकाचे हकदार आहेत. ग्रेट माणसानं कौतुक केलंय. युवा खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी पाहून आनंद झाला.'' 

टॅग्स :IPL 2020शाहरुख खानसचिन तेंडुलकरकोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्स