Join us

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा 'जबरा' फॅन; CSKच्या रुपात रंगवलंय घर, खर्च केले १.५० लाख!

CSK चा संघ यंदा प्ले ऑफपर्यंत मजल मारेल का? यावर सट्टा लावला जात आहे आणि बरीच जण 'नाही' याच पक्षातील आहेत.

By स्वदेश घाणेकर | Updated: October 13, 2020 18:39 IST

Open in App

महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यांनी ७ पैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत आणि प्ले ऑफच्या आशा जीवंत ठेवण्यासाठी त्यांना ७ पैकी ६ सामने जिंकावे लागणार आहेत. तसं न झाल्यास IPL च्या इतिहासात प्रथमच CSK प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरेल. आज चेन्नई पहिला परतीचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. चेन्नईच्या कामगिरीवर सर्व नाराजी व्यक्त करत असले तरी Yellow Armyच्या फॅन्सनी अजूनही आशा सोडलेली नाही. त्यामुळे ते आपापल्या परीनं CSKचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत.

डॅडी आर्मी असलेल्या चेन्नईनं यंदाच्या लीगमध्ये सपशेल निराश केले. सुरेश रैना व हरभजन सिंग यांच्या माघारीनंतर बसलेल्या धक्क्यातून संघ डोकं वरच काढताना दिसत नाही. त्यात प्रत्येक सामन्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) प्रयोग सुरू आहेत, फलंदाज अपयशी ठरत आहेत, हेच सांगतोय. ७ पैकी २ विजय मिळवून ४ गुणांसह सातव्या स्थानावर असलेला हा संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवेल, याची शक्यता अंधुक आहे. पण, २०१०मध्ये अशाच परिस्थितीतून चेन्नईनं थेट अंतिम फेरीत प्रवेश करून जेतेपद पटकावले होते. पण, तेव्हाचा संघ अन् आताच्या वाढलेल्या वयाचे खेळाडू यात फरक आहे.  

महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सचा जबरा फॅन गोपीकृष्णन यांनी धोनी व CSKला चिअर करण्यासाठी स्वतःच संपूर्ण घर येलो आर्मीत रंगवून टाकलं आहे. तामिळनाडू येथील कुड्डालोर येथे राहणाऱ्या गोपीकृष्णन यांनी त्यासाठी दीड लाख खर्च केले. गोपीकृष्णन चेन्नईच्या घरच्या मैदानावरील प्रत्येक सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित असतात. पण, यंदा ही स्पर्धा यूएईत होत असल्यानं त्यांना जाता स्टेडियमवर उपस्थित राहून मॅच पाहता आली नाही. 

धोनीला आतापर्यंत IPL 2020त 0*, 29*, 15, 47*, 11, 10 धावा करता आल्या आहेत. ''धोनीला प्रत्यक्ष खेळताना पाहता न येत असल्यानं मी निराश आहे. धोनीच्या कामगिरीवरून त्याच्यावर अनेक जणं टीका करत आहेत. पण, मी धोनीचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करत आहे आणि जय/पराजय आम्ही नेहमी धोनीला पाठींबा देऊ,''असे त्यांनी सांगितले.   

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनी