Join us  

IPL 2020: दिल्ली कॅपिटल्स आरसीबीविरुद्ध अडचणीत; अनुभवी खेळाडू दुखापतग्रस्त

सामना सुरु होण्याआधी दिल्लीकरांना मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 4:16 PM

Open in App

मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये शानदरा फॉर्ममध्ये असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध (Royal Challengers Banglor) भिडायचे आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत प्रत्येकी ६ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. त्यामुळे दोन्ही संघांकडे अव्वल स्थान काबिज करण्याची मोठी संधी आहे. असे असताना सामना सुरु होण्याआधी दिल्लीकरांना मोठा धक्का बसला आहे.  संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज दुखापतीमुळे आरसीबीविरुद्ध खेळू शकणार नसल्याची माहिती मिळाल्याने दिल्लीपुढे अडचणी आल्या आहेत.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये दिल्लीचा अमित मिश्रा (Amit Mishra) दुसऱ्या स्थानी असून स्पर्धेच्या इतिहासात तो सर्वात यशस्वी फिरकीपटूही आहे. हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे तो आरसीबीविरुद्ध खेळू शकणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. शारजाह मैदानावर झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना अमितच्या बोटाला दुखापत झाली होती.

अद्याप अमितने केलेल्या स्कॅनचा रिपोर्ट आलेला नाही. दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या माहितीनुसार, मिश्राच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली असून त्याला गोलंदाजी करताना अडचणी येत आहेत. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात त्याचे खेळणे निश्चित नाही. मिश्रा चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि संघ त्याच्याबाबतीत कोणताही धोका पत्करण्याचा विचार करत नाही.

मिश्राच्या अनुपस्थित आरसीबीच्या फॉर्ममध्ये आलेल्या विराट कोहलीला फिरकीविरुद्ध बाद करण्यात दिल्लीपुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून कोहली लेगस्पिनर्सविरुद्ध अडखळताना दिसला आहे. यंदाच्या मोसमातही मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना कोहली लेगस्पिनर राहुल चहरचा बळी ठरला होता. त्यामुळे आता मिश्राच्या जागी दिल्ली संघात अक्षर पटेलला संधी मिळण्याचे जवळपास निश्चित आहे. 

टॅग्स :IPL 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर