Join us  

IPL 2020 : अजिंक्य, अश्विनच्या येण्यानं दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद कोणाकडे? संघानं केली मोठी घोषणा

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठीची खेळाडूंच्या अदलाबदलीची ट्रेड विंडो बंद झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 9:45 AM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठीची खेळाडूंच्या अदलाबदलीची ट्रेड विंडो बंद झाली.  प्रत्येक संघांनी रणनीतीनुसार अनेक खेळाडूंना कायम राखले, तर काहींना डच्चू दिले. या रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये काही मोठी नावही आहेत. त्यामुळे आता उत्सुकता लागलीय ती 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणाऱ्या आयपीएल 2020च्या लिलावाची. आयपीएल ट्रेडमध्ये 11 खेळाडूंची अदलाबदली झाली. त्यात अजिंक्य रहाणे आणि आर अश्विन या टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदारांना दिल्ली कॅपिटल्सनं आपलंसं करून संघ अजून मजबूत केला. या दोन खेळाडूंच्या एन्ट्रीनंतर पुढील मोसमात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण सांभाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्याबाबत संघानं मोठी घोषणा केली आहे.

राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दाखल झाला. दिल्लीकर होणं अजिंक्यच्या फायद्याचे ठरले. अजिंक्यसाठी दिल्लीनं 1.25 कोटी अतिरिक्त रक्कम मोजली. त्याच्यासाठी आता दिल्लीनं एकूण 5.25 कोटी रक्कम मोजली आहे. राजस्थान रॉयल्सनं 2018च्या लिलावात 4 कोटीत आपल्या चमूत घेतले होते. बोल्टला एक कोटी अधिक रक्कम मिळाली. अजिंक्यसह दिल्ली संघात आता आर अश्विनही दिसणार आहे. दिल्लीनं अश्विनला किंग्ज इलेव्हन पंजाबकडून 7.6 कोटींत घेतले. 2018मध्ये पंजाबनं त्याला याच किमतीत ताफ्यात दाखल केले होते. अश्विनसाठी दिल्लीनं पंजाबला जे सुचिथ याला दिले. 

हे दोन अनुभवी खेळाडू संघात दाखल करून घेतल्यानंतर यांच्यापैकी एकाकडे कर्णधारपद सोपवलं जाऊ शकतं अशी चर्चा होती. पण, संघ मालकांनी याबाबत मोठी घोषणा केली. त्यांनी सोमवारी एक ट्विट केलं आणि त्यातून त्यांनी कर्णधार कोण, असेल याची घोषणा केली. त्यांच्या या ट्विटनुसार पुढील मोसमात कर्णधारपदाची माळ ही श्रेयस अय्यरच्या गळ्यातच असणार आहे. अश्विन आणि अजिंक्य त्याला अनुभवातून मार्गदर्शन करतील.

2018च्या सत्राच्या मध्यांतराला गौतम गंभीरनं कर्णधारपद सोडलं आणि त्यानंतर श्रेयसकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. त्यानंतर 2019च्या मोसमात अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीनं सात वर्षांनंतर प्ले ऑफमध्ये प्रवेश करत इतिहास घडवला. त्यांनी सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा एलिमिनेटर सामना जिंकला, परंतु दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात त्यांनी चेन्नई सुपर किंग्सकडून हार मानावी लागली. दिल्लीकडे शिखर धवन, पृथ्वी शॉ, इशांत शर्मा, अमित मिश्रा, कागिसो रबाडा आणि अक्षर पटेल हे अनुभवी खेळाडू आहेत. 

कायम राखलेले खेळाडूदिल्ली कॅपिटल्स : अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्षर पटेल, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, कीमो पॉल, पृथ्वी शॉ, रविचंद्रन अश्विन, रिषभ पंत, संदीप लामिछाने, शिखर धवन, श्रेयस अय्यर

करारमुक्त केलेले खेळाडू दिल्ली कॅपिटल्स - कॉलिन इंग्राम, कॉलिन मुन्रो, हनुमा विहारी, मंजोत कार्ला, बंदारू अय्यप्पा, नाथू सिंग, ख्रिस मॉरिस, जलाज सक्सेना, अंकुश बैन्स. 

टॅग्स :आयपीएल 2020अजिंक्य रहाणेआर अश्विनदिल्ली कॅपिटल्स