Join us  

IPL 2020: दिल्लीच्या धडाकेबाज फलंदाजाचे होणार पुनरागमन; पण रहाणे जाणार बाहेर

हा सामाना जिंकणेही पंजाबसाठी अनिवार्य आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचे खेळाडू त्वेषाने खेळतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 2:27 PM

Open in App

मुंबई : Indian Premier League (IPL 2020) मधील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय अनिवार्य असलेल्या सामन्यात किंग्ज ईलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) अत्यंत रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) डबल सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. या थरारक विजयानंतर पंजाब आज पुन्हा मैदानावर उतरणार असून यावेळी त्यांच्यापुढे आव्हान आहे ते गुणतालिकेत टॉप वर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचे.

हा सामाना जिंकणेही पंजाबसाठी अनिवार्य आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचे खेळाडू त्वेषाने खेळतील. यासाठीच आता दिल्लीनेही कंबर कसली असून त्यांच्या धडाकेबाज फलंदाजाचेही पुनरागमन होत आहे. मात्र यामुळे अनुभवी अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) पुन्हा संघाबाहेर बसावे लागू शकते.

प्ले ऑफ फेरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी पंजाबला आपले उर्वरीत सर्व सामने जिंकणे आवश्यक आहेत. त्याचवेळी दिल्लीला मात्र एक विजयही पुरेसा ठरणार आहे. मात्र असे असले, तरी दिल्लीकर कोणतीही कमतरता ठेवणार नाही. त्यातच त्यांचा धडाकेबाज फलंदाज तंदुरुस्त होऊन पुन्हा संघात प्रवेश करणार असल्याने दिल्लीचा आत्मविश्वास अधिक दुणावला आहे. मात्र अशावेळी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला मात्र संघाबाहेर बसावे लागेल.

दिल्लीचा हा धडाकेबाज फलंदाज आहे रिषभ पंत. पंजाबविरुद्ध दिल्लीकर आपल्या संघात बदल करतील. स्टार यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला असून तो पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचवेळी आता रहाणेला संघाबाहेर बसावे लागेल आणि त्याच्या जागी शिमरॉन हेटमायरला संधी मिळेल. त्याचवेळी पंजाबच्या संघात बदल होण्याची शक्यता कमीच आहे. 

टॅग्स :दिल्लीIPL 2020अजिंक्य रहाणे