Join us  

IPL 2020 DC  VS KKR Preview : दिल्लीविरुद्ध केकेआरला विजय आवश्यक, उभय संघांदरम्यान रंगतदार लढतीची अपेक्षा 

युवा पृथ्वी शॉ याला सलामीला चांगली खेळी करावी लागेल. शॉला गेल्या चारपैकी दोन डावांमध्ये खाते उघडता आले नाही. कर्णधार अय्यर स्नायूची दुखापत उद्भवण्यापूर्वी जशी फलंदाजी करीत होता तशी फलंदाजी करण्यात अपयशी ठरत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 6:36 AM

Open in App

अबुधाबी : गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आपले अव्वल स्थान कायम राखायचे असले तर त्यांना शनिवारी केकेआरविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत चांगली कामगिरी करावी लागेल. दिल्लीतर्फे शिखर धवन शानदार फॉर्मात आहे. त्याने गेल्या दोन्ही सामन्यांत शतके झळकावली, पण किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध फलंदाज अपयशी ठरल्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. युवा पृथ्वी शॉ याला सलामीला चांगली खेळी करावी लागेल. शॉला गेल्या चारपैकी दोन डावांमध्ये खाते उघडता आले नाही. कर्णधार अय्यर स्नायूची दुखापत उद्भवण्यापूर्वी जशी फलंदाजी करीत होता तशी फलंदाजी करण्यात अपयशी ठरत आहे. दुखापतीतून सावरलेला ऋषभ पंत संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. अय्यर व पंत व्यतिरिक्त स्टोईनिस दिल्लीच्या मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज आहे. वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्खियाने मायदेशातील सहकारी कॅगिसो रबाडाच्या साथीने दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दुखापतीमुळे नॉर्खियाला गेल्या लढतीत खेळता आले नव्हते. त्याने पुनरागमन केले तर दिल्लीची गोलंदाजी अधिक भेदक होईल. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सला बाहेर बसावे लागेल. केकेआर संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीनंतर सामन्यात उतरणार आहे. त्या लढतीत केकेआर संघाला केवळ ८४ धावा करता आल्या होत्या. केकेआर सध्या १० गुणांसह चौथ्या स्थानी आहे. 

आमने-सामने - दिल्ली - केकेआरसामने - 25विजय - दिल्ली - ११, केकेआर - १३ 

टॅग्स :IPL 2020दिल्लीकोलकाता नाईट रायडर्स