Join us  

IPL 2020 CSK vs RR Preview: एक पराभव करेल ‘प्ले ऑफ’ शर्यतीतून बाद, सुपरकिंग्स-रॉयल्सला विजय आवश्यक

या सामन्यातील पराभव प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्यास पुरेसा ठरेल, याची कल्पना उभय संघांना आहे. सुपरकिंग्स व रॉयल्स आठ संघांच्या गुणतालिकेत अनुक्रमे सहाव्या व सातव्या स्थानी आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 5:44 AM

Open in App

अबूधाबी : सारख्याच स्थितीत असलेल्या चेन्नई सुपरकिंग्स व राजस्थान रॉयल्स संघांदरम्यान इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी लढत होणार आहे. या सामन्यातील पराभव प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्यास पुरेसा ठरेल, याची कल्पना उभय संघांना आहे. सुपरकिंग्स व रॉयल्स आठ संघांच्या गुणतालिकेत अनुक्रमे सहाव्या व सातव्या स्थानी आहेत.

दोन्ही संघांना अद्याप पाच-पाच सामने खेळायचे आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा मार्ग खडतर आहे. कारण उभय संघांसाठी एकही पराभव त्यांची वाटचाल खंडित करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. दरम्यान, सुपरकिंग्स संघाला एक मोठा धक्का बसला असून त्यांचा स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो स्नायूच्या दुखापतीमुळे काही दिवसांसाठी स्पर्धेतून बाहेर झाला आहे. 

टॅग्स :IPL 2020आयपीएलमहेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्स