Join us  

IPL 2020, CSK vs RR : महेंद्रसिंग धोनीची खिलाडूवृत्ती हरवलीय? त्याने जे केलं त्याचं समर्थन करावं का?  

राजस्थानविरुद्धच्या लढतीत काल जे घडले, धोनीकडून खरेच अपेक्षित होते का? धोनीची खिलाडूवृत्ती हरवलीय का? त्याने जे केलं ते नियमाच बोट धरूनच होत का ? असे अनेक प्रश्न चर्चीले जात आहेत.. यावरून मतमतांतर आहेत, पण एका सच्चा क्रिकेट चाहत्याला धोनीच वागणं खटकणारं आहे. 

By स्वदेश घाणेकर | Published: September 23, 2020 1:00 PM

Open in App

- स्वदेश घाणेकरराजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यातील सामना हायस्कोरींग ठरला. संजू सॅमसन ( Sanju Samson), स्टीव स्मिथ ( Steven Smith) आणि फॅफ डू प्लेसिस ( Faf du Plessis) यांच्या फटकेबाजीचा शारजाह क्रिकेट स्टेडियम साक्षीदार ठरला. IPL 2020 च्या चौथ्याच सामन्यात असा हायस्कोरींग सामना झाल्याने चाहते पुढील सामन्यांसाठी सज्ज झाले आहेत. पण कालच्या सामन्यात असा एक प्रसंग घडला की त्याने MS Dhoni ( महेंद्रसिंग धोनी) चर्चेत आला.कॅप्टन कूल धोनी हा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. एक सच्चा खेळाडू, युवा खेळाडूसमोर आदर्श ( RRकडून कालच्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैस्वालने नाणेफेक होण्यापूर्वी हात जोडून धोनीचे आशीर्वाद घेतले.), क्रिकेटचे एक मुक्त विद्यापीठ असे धोनीला म्हटले तरी काही चूकीचे ठरणार नाही. आता त्याच्याकडे फक्त Indian Premier League हेच एक व्यासपीठ उरले आहे. मागील १२ पर्वात IPL मधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून तो अग्रस्थानी आहे.पण, काल जे घडले, धोनीकडून खरेच अपेक्षित होते का? धोनीची खिलाडूवृत्ती हरवलीय का? त्याने जे केलं ते नियमाच बोट धरूनच होत का ? असे अनेक प्रश्न चर्चीले जात आहेत.. यावरून मतमतांतर आहेत, पण एका सच्चा क्रिकेट चाहत्याला धोनीच वागणं खटकणारं आहे. 

नेमकं काय घडलं? 18व्या षटकाच्या दीपक चहरने टाकलेल्या 5व्या चेंडूवर टॉम कुरनला पंचांनी बाद असल्याचा निर्णय दिला. चेंडू बॅटला लागून यष्टीमागे धोनीनं झेलल्याचे वाटल्यामुळे पंचांनी कुरनला बाद दिले. पण, पंचांच्या या निर्णयावर कुरन नाराज झाला. RRकडे DRS शिल्लक नसल्यानं त्याला दाद मागता आली नाही. तो पॅव्हिलयनकडे जात असताना रिप्लेत नाबाद असल्याचे दिसले आणि तो मैदानावरच थांबला. त्यानंतर पंचांनी तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली आणि या निर्णयावरून MS Dhoni भडकला. त्यानं स्पष्ट शब्दात पंचांना सुनावलं. तिसऱ्या पंचांना कुरनला नाबाद दिले.तो खराच आऊट होता का?चेंडू बॅटला लागला की नाही, हा संभ्रम निर्माण होऊ शकतो.. पण, धोनीनं तो झेल मुळात टिपलाच नव्हता. चेंडू त्याच्या ग्लोजमध्ये विसावण्यापूर्वी टप्पा खाल्ला होता. तरीही धोनीनं OUTची अपील केली. एरवी धोनीनं अपील केली म्हणजे तो फलंदाज बादच, असे समजले जायचे, अशी अऩेक उदाहरणंही आहेत. त्यामुळेच धोनीचा आत्मविश्वास पाहून पंचांनी बाद दिले. कुरनने चुकीच्या निर्णयाचा निषेध केल्यानंतर, धोनीनं खिलाडीवृत्ती दाखवून त्याच्यासोबत उभा राहिला असता तर लोकांना ते अधिक आवडले असते. पंचांचा निर्णय हा अंतिम असतो... त्यानुसार बाद दिल्यानंतर कुरनने पेव्हेलियनमध्ये जाणे अपेक्षित होते आणि तो जातही होता. पण रिप्ले पाहून तो थांबला. पंचांनीही मग तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली, यावरून धोनीनं नोंदवलेला आक्षेप हा त्याची खिलाडूवृत्ती हरवल्याचे दर्शन घडवतेय का?   धोनीनं नियमाचं बोट धरून त्याचे मत मांडले, पण ते नसते मांडले तर अधिक उत्तम झाले असते.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीIPL 2020चेन्नई सुपर किंग्स