Join us  

IPL 2020: चेंडू उचलण्यासाठी मैदानाबाहेर गर्दी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

कोरोनामुळे आयपीएल युएईत होत आहे. आणि संसर्गाचा धोका पाहता सध्या प्रेक्षकांना या सामन्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 1:17 PM

Open in App

सोशल मिडियावर एक व्हिडियो व्हायरल झाला आहे. त्यात षटकार मारल्यानंतर चेंडू उचलण्यासाठी मैदानाबाहेर झालेली गर्दी दिसून येत आहे.  शारजाहचे मैदान लहान आहे. यामुळे बऱ्याचदा एखाद्या खेळाडूंना लांबवर मारलेला षटकार हा थेट मैदानाच्या बाहेर येऊन पडतो. त्यामुळे अनेक जण सध्या या मैदानाच्या बाहेर येऊन थांबत असल्याचे या व्हिडियोत दिसून येत आहे.

एका सामन्यात ए.बी.डिव्हिलियर्सचा एक षटकार दोन कारला लागला होता.त्यामुळे वाहतुकही संथ झाली होती. एका सामन्यात धोनीने मारलेला षटकार देखील बाहेरच्या रस्त्यावर जाऊन पडला होता. त्यावेळी हा चेंडू ज्याला सापडला त्याने तो उचलून घेतल्याचा व्हिडियो देखील व्हायरल झाला होता. त्यामुळे सध्या अनेक जण कुठला तरी षटकार बाहेर येईल आणि चेंडू मिळेल, या प्रतिक्षेत आहेत.

कोरोनामुळे आयपीएल युएईत होत आहे. आणि संसर्गाचा धोका पाहता सध्या प्रेक्षकांना या सामन्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. आयपीएलचे हे सामने शेख झायेद स्टेडिअम, अबुधाबी, दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअम आणि शारजाह क्रिकेट स्टेडिअम येथे होत आहेत. शारजाहचे मैदान हे फलंदाजांसाठी नंदनवन मानले जाते. येथील खेळपंटी संथआहे. तसेच मैदान लहान असल्याने सीमारेषा देखील इतर मैदानांच्या तुलनेत खुप जवळ आहे. त्यामुळे या मैदानावर चौकार आणि षटकारांची बरसात होतांना आपण नेहमीच पाहतो.

टॅग्स :IPL 2020दुबई